जीवरक्षकांनी वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:02 AM2019-05-27T00:02:18+5:302019-05-27T00:02:53+5:30
येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात रविवारी (दि. २६) सकाळी तलावात पोहत असलेला तरुण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यास त्वरित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.
सिडको : येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात रविवारी (दि. २६) सकाळी तलावात पोहत असलेला तरुण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यास त्वरित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.
अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव येथे रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक तरुण पोहत असताना अचानक पाण्यात बुडत असल्याचे मनपाचे जीवरक्षक बाळू नवले व संजय पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पाण्यात उडी मारून युवकास पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे त्या युवकाचे प्राण वाचले.
संबंधित तरुण हा आजारी असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तलावात पोहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. रविवारी तलावात मोठ्या प्रमाणात गर्दी असताना हा तरुण पोहत असताना पाण्यात खोलवर बुडत असल्याचे येथील जीवरक्षकांच्या लक्षात येताच त्यास बाहेर काढण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून जीवरक्षक म्हणून काम करीत आहे. रविवारी संबंधित युवक आजाराने त्रस्त असल्याने पोहण्यासाठी येणे चुकीचे आहे. असाच प्रकार अन्य व्यक्तींबद्दल आहे. आजारी असताना डॉक्टरांचे खोटे सर्टिफिकेट आणून पोहण्याचा मोह करणाºयांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
- वाळू नवले, जीवरक्षक,
स्वामी विवेकानंद जलतरण तलाव