साईबाबा समाधी मंदिरात प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:15 PM2020-02-02T23:15:59+5:302020-02-03T00:22:29+5:30

ब्राह्मणगाव-अजमीर सौंदाणे रोडलगत असलेल्या साईबाबा द्वारकामाई मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा खमताणे येथील विश्वश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि साईबाबा समाधी मंदिराचे भूमिपूजन विश्वात्मक जंगलीदास महाराज यांच्या हस्ते झाले.

Prana Pratishtha at Saibaba Samadhi Temple | साईबाबा समाधी मंदिरात प्राणप्रतिष्ठा

ब्राह्मणगाव येथील श्री साईबाबा समाधी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर विश्वात्मक जंगलीदास महाराज. समवेत आत्मा मालिक ध्यान पीठ आश्रमातील संत.

googlenewsNext
ठळक मुद्देअजमीर सौंदाणे : परिसरात भक्तिमय सोहळा

ब्राह्मणगाव : येथील ब्राह्मणगाव-अजमीर सौंदाणे रोडलगत असलेल्या साईबाबा द्वारकामाई मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा खमताणे येथील विश्वश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि साईबाबा समाधी मंदिराचे भूमिपूजन विश्वात्मक जंगलीदास महाराज यांच्या हस्ते झाले.
ब्राह्मणगाव साई सेवक मंडळातर्फे आयोजित श्री साई सचरित्र सात दिवसीय श्री साईबाबा संगीतमय कथा साई कथाकार विकास महाराज गायकवाड यांनी सादर केली. तर ज्ञानेश्वर महाराज गायकवाड यांनी पारायण केले.
या सोहळ्यात साडेसातशे पारायाणार्थींनी सहभाग घेतला होता. श्री साईबाबा यांच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. दीपक अहिरे, स्मिता आहिरे, शशिकांत बच्छाव, तुषार आहिरे, विनायक शिरोडे आदी ट्रस्टच्या सदस्यांनी संयोजन केले. यावेळी आमदार दिलीप बोरसे, राघोनाना अहिरे, सरपंच सरला अहिरे, ज्ञानदेव अहिरे, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे, किरण अहिरे, विनोद अहिरे, माजी उपसरपंच गोटू पगार, आदी उपस्थित होते.

Web Title: Prana Pratishtha at Saibaba Samadhi Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.