बिबट्याच्या बछड्याचे वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 10:33 PM2016-02-27T22:33:58+5:302016-02-27T22:36:09+5:30

बिबट्याच्या बछड्याचे वाचवले प्राण

Prana survived the leopard's calf | बिबट्याच्या बछड्याचे वाचवले प्राण

बिबट्याच्या बछड्याचे वाचवले प्राण

Next

बेलगाव कुऱ्हे : आजच्या काळात कोणत्याही प्राण्यांवर कुणीही भूतदया दाखवित नाही; मात्र प्राणिमात्रांवर दया करा या उक्तीचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा परिसरात दिसून आला आहे. एका १५ दिवसाच्या बिबट्याच्या बछड्याला कुत्र्याच्या तावडीतून वाचवित जीवदान देत येथील ग्रामस्थांनी अखेर त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्याकडे स्वाधीन करीत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याकारणाने बिबट्याचा मुक्त संचार आहे. पाणी व भक्षाच्या शोधात येथे बिबटे व त्यांची बछडे यांचा वावर असल्याचे येथील ग्रामस्थांनी अनेकदा वनविभागाला वारंवार कळवूनदेखील पिंजरा लावला गेला नाही; मात्र योगायोगाने काही महिला शेतीचे काम करीत असताना त्यांना बिबट्याचे १५ दिवसाचे बछडे आढळून येताच त्यांनी येथील मालक संतोष झनकर यांना सांगताच त्यांनी तत्काळ बेलू, ता. सिन्नर येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांना बोलावून घेतले व तुपे यांनी मोठे धाडस करीत जिवाची पर्वा न करता ते बिबट्याचे बछडे पकडले. या बछड्याजवळ कुणीही भीतीपोटी जात नव्हते. त्याच्या आईच्या आठवणीने ते आक्रोश करीत असावे, अशी जाणीव दिसून येत होती. आता या बछड्याचे काय करावे, हा प्रश्न पडताच त्यांनी भूतदया दाखवित वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना माहिती दिली, नंतर वनविभागाचे अधिकारी संजय अहिरे, वाघ, के.एस. पवार, वनरक्षक आर. के. अहिरे यांनी पाहणी करीत ते बिबट्याचे बछडे नाशिकला संगोपनासाठी पाठवले आहे. विशेष म्हणजे या परिसरात आता पिंजरा लावला गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी सरपंच रंजना विलास झनकर, समाधान झनकर, संजय मेंगाळ, विलास झनकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)पिंपळगाव डुकरा येथील संतोष झनकर यांच्या शेतात आढळलेले १५ दिवसीय बिबट्याचे बछडे वनविभागाच्या स्वाधीन करताना जीवरक्षक गोविंद तुपे, संतोष झनकर, विलास झनकर आदि.

Web Title: Prana survived the leopard's calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.