ब्राह्मणगाव  येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:14 AM2018-02-25T00:14:46+5:302018-02-25T00:14:46+5:30

येथील मंदिरात श्रीराम, राधाकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संत सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे प्रसाद महाराज यांच्या हस्ते पार पडला.

 Praniprutta ceremony in the temple of Brahmangaon | ब्राह्मणगाव  येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

ब्राह्मणगाव  येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

googlenewsNext

ब्राह्मणगाव : येथील मंदिरात श्रीराम, राधाकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संत सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे प्रसाद महाराज यांच्या हस्ते पार पडला. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सुशोभित रथातून देवतांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुसºया दिवशी सकाळी गणेशपूजन, पुण्याहवाचन, वास्तुमंडल स्थापन, रुद्रमंडल, जलाधिवास कार्यक्रम झाले. रात्री गोरखनाथ महाराज काळे, येवला यांचे जाहीर कीर्तन झाले. तिसºया दिवशी सकाळी देवता उथापन, हवन कर्म, देवता धान्यावास आदी कार्यक्रम झाले. रात्री अनंत महाराज वºहाडणे, धारणगाव यांचे जाहीर कीर्तन झाले. चौथ्या दिवशी गणेशपूजन करून संत सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे प्रमुख प्रसाद महाराज यांच्या हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात आले. महाआरती, मंगलाष्टक झाल्यानंतर महानैवेद्य दाखवण्यात आला. पौरोहित्य धुळे येथील राजेंद्र जोशी निफाडकर यांनी केले. बाळकृष्ण महाराज बोरूकुल यांचे काल्याचे कीर्तन झाले. गावातील घराघरांतून मांडे, पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता. चौकात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. यावेळी रवि बेळपाठक, राजेंद्र महाराज दोधेश्वर, मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी उपसभापती नानाजी दळवी, संचालक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विलास बच्छाव, उपसभापती राघो अहिरे, यशवंत अहिरे, ज्ञानदेव अहिरे, प्रा. के. एन. अहिरे, परिमल महाराज सटाणा, लौकिक महाराज, भालचंद्र बागड, किशोर भांगडिया उपस्थित होते.

Web Title:  Praniprutta ceremony in the temple of Brahmangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक