प्रांतिय अग्रवाल महिला अधिवेशनाची तयारी पूर्णत्त्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 04:41 PM2018-11-14T16:41:49+5:302018-11-14T16:42:23+5:30

नाशिक : महाराष्ट राज्य अग्रवाल महिला मंडळाच्या १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पंधराव्या अग्रप्रेरणा प्रांतिय अधिवेशनाची तयारी पुर्णत्त्वास आली आहे.

Prantiy Agarwal Women's Convocation Preparation | प्रांतिय अग्रवाल महिला अधिवेशनाची तयारी पूर्णत्त्वास

प्रांतिय अग्रवाल महिला अधिवेशनाची तयारी पूर्णत्त्वास

Next

नाशिक : महाराष्टÑ राज्य अग्रवाल महिला मंडळाच्या १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पंधराव्या अग्रप्रेरणा प्रांतिय अधिवेशनाची तयारी पुर्णत्त्वास आली आहे. यात प्री-वेडिंग शूटिंगची प्रथा बंद करण्याबरोबरच महिला सबलीकरणासाठीचे विविध प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती चेअरपर्सन मीना अग्रवाल व अध्यक्षा मालती गुप्ता यांनी मंगळवारी (दि़१३) पत्रकार परिषदेत दिली़
नाशिकमध्ये येत्या १८ नोव्हेंबरला होणा-या या कार्यक्र मासाठी केंद्रीय कापड मंत्री स्मृती ईराणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे ,शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रु बल अग्रवाल तसेच नाशिकच्या महापौर रंजना भानसी आदी प्रमुख अतिथी राहणार आहेत. अग्रवाल सभेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार चौधरी, महामंत्री गोपाल अग्रवाल,अग्र सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष किरण अग्रवाल, युवा अध्यक्ष मुकेश गोयंका देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. मोरपंखच्या संकल्पनेवर या अधिवेशनाची रचना आहे.
प्री-वेडिंग शूटिंग प्रथेला विरोध करण्याबरोबरच बहुतेक कुटुंबामध्ये पतीच्या आर्थिक व्यवहाराबाबत पत्नीला माहिती नसते अशावेळी आकस्मिक दुर्घटना घडल्यास पत्नीला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पतीची गुंतवणूक तसेच आर्थिक व्यवहाराची माहिती पत्नीला असावी यासाठी पती-पत्नीमध्ये आर्थिक पारदर्शकतेचा विशेष प्रस्ताव या अधिवेशनात प्रामुख्याने मांडला जाणार आहे़
पत्रकार परिषदेस अग्रवाल सभेचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार, अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षा विना गर्ग, कार्याध्यक्षा सपना अग्रवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष अलका अग्रवाल, संयोजिका डॉ़ ममता अग्रवाल, संगीता ओम अग्रवाल, अनिता मोदी, शशी अग्रवाल, सुरुची पोद्दार आदी उपस्थित होते़
प्रांतीय महिला महामंत्री उषा अग्रवाल (अकोला), शारदा अग्रवाल (धुळे), सुनंदा तंबाकुवाला, सुमित्रा भारु का (औरंगाबाद) तसेच स्थानिक पदाधिकारीसह सभेचे महामंत्री विमल सराफ, जिल्हाध्यक्ष शाम ढेडिया, राष्टÑ्रीय सदस्य महेश सत्यप्रकाश, सुशिल केडीया, डॉ बाबूलाल अग्रवाल, दिनेश अग्रवाल, रविंद्र केडीया, सखी मंच अध्यक्षा प्रियंका अग्रवाल, सिमा सिंघानिया, कृष्णा अग्रवाल, महिला मंडळाच्या अरूणा अग्रवाल, निरा गुप्ता, संजू मित्तल, नीरा अग्रवाल, रंजना गुप्ता, उमा केडीया, प्रेमा हिसारिया, करु णा अग्रवाल, युवा मंच अध्यक्ष अंकित अग्रवाल, महेंद्र पोद्दार, मनीष अग्रवाल, अंशुल अग्रवाल यांच्यासह नाशिकची संपूर्ण टीम या आयोजन व नियोजनात व्यस्त झालेली आहे.
-----------------
यांचा होणार सन्मान
अग्रज्योती नारी शक्ती पुरस्कार :- विना गर्ग, अलका अग्रवाल (नाशिक), ममता गिंदोडिया, निर्मला अग्रवाल (धुळे), अनिता अग्रवाल (जालना), अग्रप्रभा पुरस्कार :- कल्पना चौधरी (नांदेड), मंजू तलस्यान (अकोला-नागपूर), शिला अग्रवाल (पुणे), शोभा पालडीवाल (शेगाव), विशेष पुरस्कार :- अरुणा अग्रवाल, डॉ़ ममता अग्रवाल व सपना अग्रवाल (नाशिक), यांच्यासह विशेष सहकार्यकर्ते गोपाल अग्रवाल (बोदवड), विनोद अग्रवाल (धुळे), पुरूषोत्तम अग्रवाल (मुंबई), बसंतलाल बाछुका (अकोला), कांतिलाल अग्रवाल (राहाता), सोमबाबू अग्रवाल , ताराचंद गुप्ता , नेमिचंद पोद्दार , ओमप्रकाश गर्ग (नाशिक), कवि उज्वल अग्रवाल (परतवाडा) यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

Web Title: Prantiy Agarwal Women's Convocation Preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.