पेठ तालुक्यात भातासह खुरसणी, उडीद पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 10:33 PM2019-11-02T22:33:41+5:302019-11-02T22:35:50+5:30

पेठ : चार महिने उलटूनही पाऊस ओसरायला तयार नसल्याने तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आदिवासी बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुका जवळजवळ संपूर्णत: खरिपावरच अवलंबून आहे.

Prasha taluka with rice in chilli, urad water | पेठ तालुक्यात भातासह खुरसणी, उडीद पाण्यात

पेठ तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातपिकाचे झालेले नुकसान.

Next
ठळक मुद्देकापून ठेवलेले भातही पावसाच्या पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : चार महिने उलटूनही पाऊस ओसरायला तयार नसल्याने तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आदिवासी बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुका जवळजवळ संपूर्णत: खरिपावरच अवलंबून आहे.
डोंगराळ जमीन, सिंचनाचा अभाव यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामावर अवलंबून असतात. भात हे एकमेव आर्थिक उत्पन्नाचे साधन असताना यावर्षी काहीशा उशिराने सुरू झालेल्या पावसाने तब्बल एक महिना आपला मुक्काम वाढवल्याने परिपक्व झालेल्या भाताची पिके पाण्यात सापडली आहेत.
मध्यंतरी काही दिवस उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भाताची कापणी सुरू केली होती. मात्र कापून ठेवलेले भातही पावसाच्या पाण्यात भिजल्याने आदिवासी शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
भाताबरोबर खुरासणी, उडीद, मूग, भुईमूग या पिकांनाही पावसाचा तडाका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतपिकांची तात्काळ पाहणी करून शेतकºयांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली असून, जिल्हा प्रशासनास पाठविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नुकसान अहवालात पेठ तालुका निरंक दाखवण्यात आल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करीत फेरपंचनामे करून अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Prasha taluka with rice in chilli, urad water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.