भाजपामध्ये खांदेपालट नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव; ग्रामीण जिल्हाध्यक्षही बदलले
By संजय पाठक | Published: July 19, 2023 09:36 AM2023-07-19T09:36:28+5:302023-07-19T09:36:44+5:30
शंकर वाघ सुनील बच्छाव यांची नियुक्ती
नाशिक- भाजपामध्ये अखेर संघटनात्मक बदल झाले असून नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शंकर वाघ आणि सुनील बच्छाव यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपाचे शहराध्यक्षपदी यापूर्वी गिरीश पालवे होते. माजी आमदार बाळासाहेब सानप यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारण्यात आली तसेच शहराध्यक्षपद काढून घेण्यात आल्यानंतर गिरीश पालवे यांना संधी देण्यात आली होती त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
गेल्या वर्षभरापासून शहराध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू असली तरी प्रदेशाध्यक्ष बदलल्याने संघटनात्मक निवडणूका घेऊन अध्यक्ष निवडण्याऐवजी थेट नियुक्तीच झाली आहे. प्रशांत जाधव हे भाजपा शहर कार्यकारणी सलग दोन वेळा संघटन सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. 2017 मध्ये त्यांची नाशिक महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान ग्रामीण भागातील जिल्हाध्यक्ष देखील बदलण्यात आले असून येथे सुनील बच्छाव आणि शंकर वाघ यांना संधी देण्यात आली आहे.