विठेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 11:04 PM2022-05-23T23:04:00+5:302022-05-23T23:05:36+5:30

लोहोणेर : देवळा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या अशा विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम यांची तर व्हाइस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Prashant Nikam as the Chairman of Vithewadi Society | विठेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम

विठेवाडी सोसायटी चेअरमनपदी प्रशांत निकम व व्हाईस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड झाल्या नंतर आनंद व्यक्त करताना संचालक मंडळ व सभासद व ग्रामस्थ.

googlenewsNext
ठळक मुद्देलोहोणेर : व्हाईस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड

लोहोणेर : देवळा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या अशा विठेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत निकम यांची तर व्हाइस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विठेवाडी येथील विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक सोसायटी कार्यालयात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्याशी अधिकारी सुजय पोटे होते. चेअरमन पदासाठी प्रशांत शंकर निकम व व्हाईस चेअरमन पदासाठी समाधान पंडित निकम यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पोटे यांनी प्रशांत निकम याची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी समाधान निकम यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी नवनिर्वाचित संचालक महेंद्र आहेर, कुबेर जाधव, पंडित निकम, बाळू सोनवणे, तानाजी निकम, शशिकांत निकम, जिभाऊ बोरसे, सुनंदा निकम, सुनीता निकम, अभिजित निकम, कैलास कोकरे आदींसह पंडित निकम, दिनकर जाधव, अशोक आहेर, धनाजी निकम, बाळासाहेब निकम, फुला जाधव, नंदलाल निकम, ईश्वर निकम, प्रवीण निकम, टिंकू निकम, धनंजय बोरसे, अमर जाधव, राहुल निकम, जितेंद्र निकम, तुषार निकम, नानू निकम, करण निकम, अशोक निकम, विकी निकम यांचेसह सोसायटीचे सचिव संजय निकम, गोरख पवार, सुभाष पगार आदी उपस्थित होते. कुबेर जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
 

Web Title: Prashant Nikam as the Chairman of Vithewadi Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.