सटाणा सहकारी संघाच्या सभापतिपदी प्रवीण बागड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:59 AM2019-01-23T00:59:16+5:302019-01-23T00:59:32+5:30
येथील सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी प्रवीण बागड यांची, तर उपसभापतिपदी देवेंद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
सटाणा : येथील सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी प्रवीण बागड यांची, तर उपसभापतिपदी देवेंद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सभापती नीलेश पाकळे व उपसभापती राहुल सोनवणे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदांचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेच्या निवडीसाठी सहायक निबंधक कार्यलयात निवडणूक अधिकारी सतीश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२२) विशेष सभा घेण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत बागड व सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी पाटकर यांनी जाहीर केले. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी ग्राहक संघाच्या संचालक व कृउबाच्या सभापती मंगला सोनवणे यांनी नवनिर्वाचित सभापती प्रवीण बागड यांचा सत्कार केला. मावळते उपसभापती राहुल सोनवणे यांनी नवनिर्वाचित उपसभापती देवेंद्र सोनवणे यांचा सत्कार केला. निवडीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सभापती प्रवीण बागड, उपसभापती देवेंद्र सोनवणे व संचालक मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्राहक संघाचे माजी सभापती व विद्यमान संचालक अरविंद सोनवणे, किरण सोनवणे, राहुल सोनवणे, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, दिलीप येवला, राजेंद्र देवरे, अरु ण सोनवणे, राजेंद्र सरदार, नितीन अमृतकार, योगेश अमृतकार, नितीन येवला आदी उपस्थित होते.