धन्वंतरी पूजन करून आरोग्यासाठी प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:16 AM2018-11-06T01:16:20+5:302018-11-06T01:16:58+5:30
आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे शहरातील विविध आयुर्वेद रुग्णालये, महाविद्यालयांसह अन्य पॅथी रुग्णालये व महाविद्यायांसोबतच स्वतंत्ररीत्या आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यांनी श्रद्धेने पूजन करून सर्व रुग्णांसह नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली.
नाशिक : आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे शहरातील विविध आयुर्वेद रुग्णालये, महाविद्यालयांसह अन्य पॅथी रुग्णालये व महाविद्यायांसोबतच स्वतंत्ररीत्या आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यांनी श्रद्धेने पूजन करून सर्व रुग्णांसह नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली. शहरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सुशीला चिकित्सालय आयुर्वेद केंद्र येथे भगवान धन्वंतरींचे पूजन व आरती केली. यावेळी एक्सरे तज्ज्ञ डॉ. राजेंद्र खाडे व आयुर्वेद केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रांत जाधव उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी व अध्यापकांनी आयुर्वेदाशी संबंधित विविध ग्रंथांसह वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचे मंत्रोच्चाराच्या माध्यमातून पूजन केले. तसेच मंत्रोच्चार पठण करतानाच ब्रह्मवृंदांनी यज्ञकुंडात भगवान धन्वंतरींना आहुती अर्पण करून पूजन केले. गणेशवाडीतील आयुर्वेद महाविद्यालयातही धन्वंतरी पूजन करून तृतीय राष्ट्रीय आयुर्वेद दिवस समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयुर्वेद सेवा संघ व आयुर्वेद व्यासपीठ, आरोग्य भारती नाशिक, जिल्हा आयुर्वेद संमेलन यांच्यातर्फे आयुर्वेद सेवा शरद पाठक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला वैद्य अभय कुलकर्णी, वैद्य शंकरलिंगम दासरी, वैद्य राजेंद्र खरात, वैद्य विजय भोकरे, वैद्य कमलेश महाजन, वैद्य एकनाथ कुलकर्णी व वैद्य देवेंद्र बच्छाव आदी उपस्थित होते. यावेळी भगवान धन्वंतरींच्या विविध प्रतिमांचे व प्रार्थनांचे सादरीकण सुचिता पांडे यांनी केले. त्यानंतर वैद्य शशिताई आहिरे, वैद्य रमेश भट, वैद्य निला भट, वैद्य निलांबरी शुक्ल व वैद्य वसंतराव गर्गे यांचे औक्षण करून त्यांना औषधी वनस्पती व आयुर्वेद पत्रिका भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अष्टांगहृदय या आयुर्वेदीय ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्याचप्रमाणे सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयातही धन्वंतरी जयंतीनिमित्त भगवान धन्वंतरीचे वैद्य परशुराम पवार यांनी प्रतिमापूजन के ले. तसेच आयुर्वेद ग्रंथांचेही यावेळी पूजन करण्यात आले. वैद्य अपर्णा राऊत, वैभव फरताळे, प्रीती दासरी आदी उपस्थित होते.
संदर्भ सेवा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी संदर्भ रुग्णालयात ५० हजार रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांचा आमदार देवयांनी फरांदे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक स्वाती भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे, एक्सरे तज्ज्ञ डॉ. मंगेश थेटे उपस्थित होते.