एनआरसी-सीएएविरोधात प्रार्थनासभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:43 PM2020-01-19T22:43:54+5:302020-01-20T00:13:28+5:30

इमाम अहमद रजा इदगाह मैदान येथे पास्बाने ऐन-ए-हिंद कमिटीच्या वतीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात सकाळी प्रार्थना सभा घेण्यात आली.

Prayer session against NRC-CAA | एनआरसी-सीएएविरोधात प्रार्थनासभा

मालेगावी पास्बाने ऐन-ए-हिंद कमिटीच्या वतीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात आयोजित प्रार्थना सभेत मार्गदर्शन करताना मुफ्ती नुुरुलहसन मिस्बाही. समवेत हाफीज सज्जाद हुसेन अशरफी, मोहंमद नईम मिस्बाही, मौलाना अहमद रजा अजहरी, मोहंमद अशफाक अमजादी आदी.

Next
ठळक मुद्देमालेगाव : पास्बाने ऐन-ए- हिंद कमिटीतर्फे कार्यक्रम

मालेगाव मध्य : इमाम अहमद रजा इदगाह मैदान येथे पास्बाने ऐन-ए-हिंद कमिटीच्या वतीने एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात सकाळी प्रार्थना सभा घेण्यात आली.
यावेळी मुफ्ती नुुरुलहसन मिस्बाही यांनी मार्गदर्शन केले. भारतीय नागरिकांना आपण भारतीय आहोत हे सिद्ध करावे लागणे हा भारतीयांचा अपमान आहे. देश शांततेत विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करीत आहे. सरकारने लादलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात सर्वत्र निदर्शने होत आहे. मात्र काही लोकांकडून पवित्र ज्ञानदान करणाऱ्या केंद्रावर हल्ले होत आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारकडून दोन्ही कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रार्थना सभेत करण्यात आला. हाफीज सज्जाद हुसेन अशरफी यांचेही भाषण झाले. यावेळी शाहीनबाग येथील आंदोलनात सहभागी झालेले अब्दुल कादीर, मोहंमद अल्मास यांच्यासह मोहंमदनईम मिस्बाही, मौलाना अहमद रजा अजहरी, मोहंमद अशफाक अमजादी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दोन्ही कायद्याच्या विरोधात व देशाच्या शांततेसाठी सामूहिक दुवा पठण करण्यात आले. यावेळी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी राष्टÑध्वज घेत किदवाई रस्ता येथील शहीदों की यादगार येथून दुचाकीने निघत नवीन बसस्थानक, खोका नाका, देवीचा मळामार्गे इमाम अहमद रजा इदगावर पोहचले. यावेळी हाफीज अमीन अशरफी, हाजी रफीक अतारी, हाफीज उमर फारुख, हाफीज मोहंमद रफीक, अ‍ॅड. जमाल शेख, मुदस्सर रिजवी, डॉ. रईस रिजवी, कारी जैनुलअबादीन यांच्यासह मौलाना मुफ्ती, मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Web Title: Prayer session against NRC-CAA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.