प्री मॅटर्निटी फोटोशूटचे तरुणाईला लागले ‘डोहाळे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:54 IST2019-11-09T23:19:13+5:302019-11-10T00:54:20+5:30

छायाचित्रांच्या माध्यमातून बारशापासून ते विवाह सोहळ्यापर्यंतचे सोनेरी क्षण जतन करुन ठेवण्याचा जमाना माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात मागे पडला असे एकीकडे म्हटले जात असतानाच पुन्हा एकदा हा छायाचित्रांचा ट्रेंड तरुणाईमध्ये रुजू पाहतो आहे. लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा फंडा जोमात आहेच पण आता लग्नानंतर ‘डोहाळे’ लागलेल्या आपल्या अर्धांगिनीसोबत प्री मॅटर्निटी फोटोशूट करण्याच्या प्रेमातही तरुणाई पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

Pre-maternity photoshoot teenager begins 'eyes'! | प्री मॅटर्निटी फोटोशूटचे तरुणाईला लागले ‘डोहाळे’!

प्री मॅटर्निटी फोटोशूटचे तरुणाईला लागले ‘डोहाळे’!

ठळक मुद्देनिसर्गरम्य ठिकाणांना पसंती : फॅमिली फिजिशिएन्सकडून मार्गदर्शनछायाचित्रांचा रुजतोय टेÑण्ड

चंद्रमणी पटाईत । लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : छायाचित्रांच्या माध्यमातून बारशापासून ते विवाह सोहळ्यापर्यंतचे सोनेरी क्षण जतन करुन ठेवण्याचा जमाना माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात मागे पडला असे एकीकडे म्हटले जात असतानाच पुन्हा एकदा हा छायाचित्रांचा ट्रेंड तरुणाईमध्ये रुजू पाहतो आहे. लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा फंडा जोमात आहेच पण आता लग्नानंतर ‘डोहाळे’ लागलेल्या आपल्या अर्धांगिनीसोबत प्री मॅटर्निटी फोटोशूट करण्याच्या प्रेमातही तरुणाई पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
पूर्वी साखरपुड्यापासून ते लग्नविधीतील झालझेंड्यापर्यंतचे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त केले जायचे. त्याचा छानसा अल्बम प्रत्येकाच्या अलमारीत ठेवला जायचा आणि घरी येणाºया पाहुण्यांना तो आवर्जून दाखविलाही जायचा. याचबरोबरच व्हिडिओ शूटींगचा प्रकारही जनमानसात चांगलाच रुजला. छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्मयातून विवाह सोहळ्याचे सोनेरी क्षण जतन करुन ठेवले जात असतानाच गेल्या काही वर्षात प्री वेडिंग फोटोशूटची संकल्पनाही तरुणाईच्या पसंतीला उतरली. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन लग्नापूर्वी छायाचित्रण व चित्रीकरणाचा हा नवा व्यवसाय उदयाला आला. आता त्याही पुढे जात तरुणाईमध्ये प्री मॅटर्निटी फोटोशूटची संकल्पना रुजू पाहते आहे. लग्नानंतर नवदाम्पत्याकडून साहजिकच गोड बातमीची अपेक्षा कुटुंबीयांकडून केली जाते. कुटुंबीयात नवा सदस्य येण्याची चाहूल लागल्यानंतर सूनबाईचे कोडकौतुक पुरविले जातात. तिने काय खावे आणि कसे वागावे याचे वेळापत्रकच ठरवून दिले जाते. याच डोहाळेचेही आनंदी क्षण कॅमेºयात बंदिस्त करण्यासाठी प्री वेडिंग मॅटर्निटी फोटोशूटची क्रेझ सध्या जोमात आहे. चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून आलेल्या या नव्या टेÑण्डचा ग्रामीण भागातही चांगलाच प्रभाव दिसून येतो. अनेक दाम्पत्य विविध धार्मिक व निसर्गरम्यस्थळी जात प्री मॅटर्निटी फोटोशुट करत आहेत. विशेष म्हणजे या फोटोशूटच्यावेळी जन्माला येणाºया बाळासह आईला काही अपाय होणार नाही, यासाठी फॅमिली फिजिशिएन्सकडून मार्गदर्शनही घेण्यात येत आहे.
विविध प्रकारच्या
अल्बम्सला पसंती
लग्नावेळी ज्याप्रमाणे विविध प्रकारचे फोटो अल्बम्स बनविले जातात, त्याच धर्तीवर प्री मॅटर्निटी फोटॉशूटमध्येही विविध अल्बम्सला पसंती दिली जात आहे. करिझ्मा आणि डिजिटल प्रिटींग अल्बम्स सध्या भाव खात आहेत. तसेच थ्रीडी अ‍ॅनिमेशनलाही दाम्पत्यांकडून मागणी होत आहे. पाच हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत अल्बम्सचे भाव आहेत. त्याचप्रमाणे अनेक दाम्पत्यांकडून केवळ फोटोशूट करण्यात येत असून, त्याचा डेटा फोटोग्राफर्सकडून घेऊन त्याची सीडी बनवून संगणकात संकलित करण्यात येत आहे. यामुळे आर्थिक खर्चही कमी करण्यास मदत मिळत आहे. तर अनेक हौसी दाम्पत्यांकडून महागडे आणि डिजिटल व अ‍ॅमिमेटेड अल्बम्स तयार करुन घेण्यास प्रतिसाद मिळत असल्याचे फोटोग्राफर्सकडून सांगण्यात आले.

Web Title: Pre-maternity photoshoot teenager begins 'eyes'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.