प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद

By admin | Published: September 27, 2016 11:35 PM2016-09-27T23:35:11+5:302016-09-27T23:35:55+5:30

अन्याय : ३ लाख ८७ हजार १२० अल्पसंख्याक विद्यार्थी वंचित

Pre-matric scholarships closed | प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद

Next

मालेगाव : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१५-१६ च्या नूतनीकरणात मंजूर लाभार्थींपैकी ३ लाख ८७ हजार १२० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. २०१४-१५ वर्षात ७ लाख १७ हजार ८९६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती.
या योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रारंभीपासूनच तक्रारी आहेत. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलचा उपयोग करण्यात आला होता. यात डेटा भरताना व अपलोड करताना शाळांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. तक्रारींचे निराकरण होत नसल्याने राज्यभरातील शाळांनी नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती डेटाशीटमध्ये भरून सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी (आॅफ लाइन) शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडे दाखल केली होती. २०१४-१५ साली नूतनीकरण व नवीन मिळून ७ लाख १७ हजार ८९६ विद्यार्थ्यांना राज्यात शिष्यवृत्ती देण्यात आली होती. २०१५-१६ च्या संचालनालयाकडून प्राप्त नूतनीकरणाच्या यादीत राज्यातील विविध शाळांतील ३ लाख ८७ हजार १२० विद्यार्थ्यांची नावे गायब झाली आहेत.
या प्रकरणी जबाबदार असलेल्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे संचालक नंदन बागरे यांची बदली करण्यात यावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून उर्वरित ३ लाख ८७ हजार १२० पात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नूतनीकरण करून शिष्यवृत्ती देण्यात यावी, या वर्षासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजिद अहमद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व अल्पसंख्याक मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pre-matric scholarships closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.