औद्योगिक वसाहतीत नूकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 05:03 PM2020-06-09T17:03:20+5:302020-06-09T17:06:52+5:30

शहरातील अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत पावसाचे पाणी साचून उद्योजकांचे नुकसान होऊ नये, यासाठी आयामा पदाधिकारी व  एमआयडीसी अधिकारी यानी औद्योगिक वसाहतीतत संयुक्त पाहणी केली.

Pre-monsoon inspection by authorities to prevent damage to industrial estates | औद्योगिक वसाहतीत नूकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व पाहणी

औद्योगिक वसाहतीत नूकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व पाहणी

Next
ठळक मुद्देपावसाळ्यात उद्योगांचा नूकसान टाळण्याचा प्रयत्न एमआयडीसी अधिकाऱ्यांचा औद्योगिक वसाहतीत पाहणी दौरा

नाशिक : शहरातील अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत पावसाचे पाणी साचून उद्योजकांचे नुकसान होऊ नये, यासाठी आयामा पदाधिकारी व  एमआयडीसी अधिकारी यानी औद्योगिक वसाहतीतत संयुक्त पाहणी केली. औद्योगिक वसाहतीत पावसाळ्यात दरवर्षी अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबते. तसेच कारखान्यामध्ये पावसाचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात उद्योजकांचे नुकसान होते.याची आयमाच्या  पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन पावसाळ्याच्या सुरवातीला एमआयडीसीचे अधिकारी तसेच स्थानिक नगरसेवक यांच्याबरोबर अंबड औद्योगिक वसाहतीत पाहणी केली. यात अंबड औद्योगिक वसाहती मधील पावर हाऊस, एफ सेकटर, सी सेकटर, डब्लू सेक्टर अशा वेगवेगळ्या सेक्टर मधील पाणी तुंबण्याच्या ठिकाणांचे पाहणी केली. यात प्रथम सर्व औद्योगिक वसाहतीतील नाले साफसफाई तसेच जेथे आवश्यक आहे तेथे रस्त्याच्या बाजूला व रस्त्याखालून क्रॉसिंग पाईपलाईन टाकणे काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने गाळ व पालापाचोला काढणे अशा प्रकारे वेगवेगळ्या कामाबाबत चर्चा केली. त्यावर एमआयडीसीचे उपअभियंता नितीन पाटील, सहायक अभियंता एस. बी. चावरकर, नगरसेवक  राकेश दोंदे यांनी पाहणी केलेल्या सेक्ट्रर मध्ये ताबड्तोब उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आयमा चे उपाध्यक्ष निखिल पांचाळ , सल्लागार समिती अध्यक्ष  धनंजय बेळे, आयपीपी राजेंद्र्र अहिरे, सरचिटणीस ललित बुब, सुदर्शन डोंगरे, दिलीप वाघ, जगदीश पाटील, विजय जोशी, राजेंद्र्र वडनेरे माजी अध्यक्ष विवेक पाटील व उद्योजक उपस्थित होते. 

Web Title: Pre-monsoon inspection by authorities to prevent damage to industrial estates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.