महावितरणकडून माॅन्सूनपूर्व कामे जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:27+5:302021-05-30T04:12:27+5:30
वीजवाहिन्यांना पावसाळ्यात वारा, वादळाने झाडाझुडपांच्या फांद्या लागून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. पावसाळ्यात चिखलामुळे दुरुस्तीच्या कामांना अडचणी येतात. ...
वीजवाहिन्यांना पावसाळ्यात वारा, वादळाने झाडाझुडपांच्या फांद्या लागून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. पावसाळ्यात चिखलामुळे दुरुस्तीच्या कामांना अडचणी येतात. त्याअनुषंगाने धावडा सबस्टेशन महावितरणच्या कंपनीचे कर्मचारी माॅन्सूनपूर्व दुरुस्तीची कामे करीत आहेत. विद्युत वाहिन्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांची कटिंग करून विद्युत वाहिन्या व्यवस्थित करून घेतल्या जात आहेत. चांदोरी येथील वीज महावितरण उपकेंद्रच्या अंतर्गत असलेल्या चांदोरी खेरवाडी, चितेगाव, शिंपी टाकळी, दारणसांगवी, बेरवाडी, सायखेडा, चाटोरी आदी गाव परिसरात महावितरण अंतर्गत कामे सुरू आहेत.
तसेच दरवर्षी गोदाकाठला महापुराचा वेढा बसत असतो. या आपत्तीमध्ये पूरबाधित क्षेत्र सोडून इतर गावांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आवाहन असते. तसेच पूरपातळी कमी झाल्यास लगेच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन चांदोरी येथील उपकेंद्रचे अधिकारी व कर्मचारी पेलत आहे.
दरम्यान, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकांनीही वेळेवर वीजबिले भरावीत, असे आवाहन केले जात आहे.
पावसाळ्यात वीजतारा मेन्टेनन्स व महापुराच्या दृष्टीने चांदोरी उपकेंद्राने सर्व तारांना ताण देणे, वीजवहिनीवरील फांद्या तोडणे व खांबांची पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहे. पुढील काही दिवसांत ही कामे पूर्ण होतील. नागरिकांनी आपले वीज बिले योग्य वेळेत भरावे.
- विशाल मोरे, सहाय्यक अभियंता, चांदोरी उपकेंद्र
फोटो- २९ चांदोरी लाइट
वीजवाहिनीची दुरुस्ती करताना कर्मचारी.
===Photopath===
290521\29nsk_12_29052021_13.jpg
===Caption===
फोटो- २९ चांदोरी लाइट वीज वाहिनीची दुरुस्ती करताना कर्मचारी