पुरवठा खाते पूर्वपदावर, कर्मचाऱ्यांचे काम सुरू

By admin | Published: June 4, 2015 12:20 AM2015-06-04T00:20:07+5:302015-06-04T00:34:05+5:30

पुरवठा खाते पूर्वपदावर, कर्मचाऱ्यांचे काम सुरू

Pre-payment of supply accounts, employees' work | पुरवठा खाते पूर्वपदावर, कर्मचाऱ्यांचे काम सुरू

पुरवठा खाते पूर्वपदावर, कर्मचाऱ्यांचे काम सुरू

Next

नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्यातील तहसीलदारांचे निलंबन केल्याच्या कारणावरून पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक इशाऱ्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारनंतर काम पूर्ववत सुरू केल्याचे चित्र आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह तब्बल नऊ तहसीलदारांना धान्य घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. त्यातील सात जणांची चूक नसल्याचे कारण देत तहसीलदार संघटनेसह कर्मचाऱ्यांनी पुरवठ्याचे काम बंद केले होते. त्यातच अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांचीही बदली झाली. नागरिकांना वेळेवर रेशनचे धान्य मिळत नसल्याचे कारण देत काही संघटनांनी जिल्हा पुरवठा कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. धान्य उचलण्यासही कोणी वाहतूकदार इच्छुक नसल्याने पुरवठ्याचे काम थांबले होते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांना धान्य पुरवठा कसा करायचा, असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर होता. मात्र आता पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामकाजात सहभाग घेतल्याने पुरवठा खात्याचे काम हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pre-payment of supply accounts, employees' work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.