नार-पार प्रकल्पाला प्राधान्य

By admin | Published: May 22, 2017 01:14 AM2017-05-22T01:14:23+5:302017-05-22T01:14:57+5:30

झोडगे : पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नार-पार प्रकल्प पूर्ण करण्याच्या कामाला प्राध्यान्य देत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी येथे केले

Pre-project project priority | नार-पार प्रकल्पाला प्राधान्य

नार-पार प्रकल्पाला प्राधान्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
झोडगे : मालेगाव व परिसराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नार-पार प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या कामाला प्राध्यान्य देत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी येथे केले. प्रभाग क्रमांक १० तसेच इतर प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित चर्चमागील सर्वेश्वर महादेव मंदिर आवारात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
राज्यमंत्री भामरे पुढे म्हणाले की, मालेगाव शहरासाठी शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, भूमिगत गटार योजना, शहरात बालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्याने, सांडपाण्याचे व कचऱ्याचे योग्य निवारण, सुंदर व स्वच्छ शहर व प्रगत मालेगाव निर्मितीसाठी भारतीय जनता पार्टीच्या हाती सत्ता द्या.
भ्रष्टाचाररहित व पारदर्शक कामासाठी भाजपाला निवडून द्या, असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते सुरेशनाना निकम, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, लकीली गील, मनीषा पवार, उमेदवार पंकज बच्छाव, प्रवीण बच्छाव, सुमन कदम, मनीषा हिरे आदी उपस्थित होते.

Web Title: Pre-project project priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.