चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला शस्त्रसाठा प्रकरणी पोलिसांची सावधगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:42 PM2017-12-17T23:42:00+5:302017-12-18T00:18:53+5:30
चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे.
नाशिक : चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे.
सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे; मात्र याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकाºयांकडून कु ठलीही माहिती दिली जात नाही किंवा तपास कुठल्या दिशेने पुढे सरकला आहे, तपासाबाबतची प्रगती आदींच्या बाबतीत कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांनाही न देता अत्यंत सावधगिरीने व सूक्ष्मरीत्या या प्रकरणाचा े पोलीस यंत्रणा तपास करीत आहे. एकूणच यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्यासारखे असून, महत्त्वाचे धागेदोरे तपासी यंत्रणेच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही व पोलीस यंत्रणेला खात्रीलायक धागेदोरे व उर्वरित संशयित आरोपींचा थांगपत्ता तसेच लुटलेल्या शस्त्रांपैकी काही शस्त्रे कुठे लपविली किंवा कोणाला विक्री केली याचा तपास केला जात आहे. सर्वच शक्यता लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. दहशतवादविरोधी पथकदेखील याप्रकरणी सतर्क झाले असून, पथकाने नाशिकला येऊन स्थानिक अधिकाºयांशी चर्चाही केली आहे. संशयितांकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. तसेच बेशुद्ध करण्याच्या औषधांच्या बºयाच बाटल्या व ४८ हजारांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे. यावरून या सर्व प्रकरणाची व्याप्ती भली मोठी असून, त्याविषयी गुप्तता बाळगण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेसह संपूर्ण तपास यंत्रणेला गृह विभागाकडून मिळाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.