गर्भवती महिलांचे आरोग्य जोपासण्याला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 10:09 PM2017-10-08T22:09:04+5:302017-10-08T22:09:50+5:30
मालेगाव : घरात संपन्नता हवी तर घरातील सर्व सदस्य निरोगी हवे. केंद्र व राज्य शासनातर्फे लहान बालके व गर्भवती महिलांसाठी मिशन इंद्रधनुष्य हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभाचा बहुमान मालेगावला मिळला हे निश्चितच अभिनंदनीय आहे. शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करत हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.
दीपक सावंत : मिशन इंद्रधनुष्य अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ; परिचारिका महाविद्यालय इमारत लोकार्पण
मालेगाव : घरात संपन्नता हवी तर घरातील सर्व सदस्य निरोगी हवे. केंद्र व राज्य शासनातर्फे लहान बालके व गर्भवती महिलांसाठी मिशन इंद्रधनुष्य हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभाचा बहुमान मालेगावला मिळला हे निश्चितच अभिनंदनीय आहे. शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करत हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.
येथील सामान्य रुग्णालयात राज्यस्तरीय मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अभियानाचा शुभारंभ तसेच परिचारिका महाविद्यालय इमारतीचे लोकार्पण आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. महिला व मुलांचे रुग्णालय इमारतीच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभही डॉ. सावंत यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
यावेळी जिल्हास्तरीय ब्लड बँक सहा महिन्यात मालेगावला दिली जाईल. तसेच महिला व मुलांच्या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्तीची ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
व्यासपीठावर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, संचालक संजीव कुमार, सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, जि. प. आरोग्य सभापती यतिन पगार, महापौर शेख रशीद, उपमहापौर सखाराम घोडके, माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, मौलाना अब्दुल बारी, स्थायी समिती सभापती सलीम अन्वर, मनपा उपायुक्त अंबादास गरकल, सुशील वाघचौरे, सुरेश जगदाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गोरगरीब व कामगारांचे प्राबल्य असलेल्या शहर व तालुक्यात मिशन इंद्रधनुष्य अभियानाचा शुभारंभ व्हावा तसेच महिला व मुलांचे शंभर खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करावे, असा आग्रह राज्यमंत्री भुसे यांनी धरला होता. महिला व मुलांना उपचाराची सोय होण्यासह ते रोगमुक्त राहावे ही भावना भुसे यांची होती. आरोग्यमंत्री म्हणून नव्हे तर डॉक्टर म्हणून आपल्या लक्षात आल्याने त्यांची मागणी आपण मान्य केली असे स्पष्टकरून डॉ. सावंत पुढे म्हणाले की, राज्यस्तरीय मिशन इंद्रधनुष्य अभियानाचा झालेला शुभारंभ मालेगावकरांचा लौकिक वाढविणारा ठरला आहे. मालेगावकरांनी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. महिला व मुलांच्या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाची नियुक्ती तसेच परिचारिका महाविद्यालयाभोवती कम्पाउंड वॉल व कर्मचाºयांची नियुक्ती व सर्वात महत्त्वाचे जिल्हास्तरीय ब्लड बँकेचा शुभारंभ आदी भुसे यांनी केलेल्या मागण्या लालफितीत अडकणार नाहीत, याची ग्वाही सावंत यांनी दिली.
येत्या सहा महिन्यात जिल्हास्तरीय ब्लड बँक मालेगावी कार्यान्वित केली जाईल. रक्ताअभावी एकाही गर्भवती महिलेचा मृत्यू होऊ देणार नाही, अशी घोषणा करत आरोग्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, मिशन इंद्रधनुष्य अभियान यशस्वीतेसाठी सर्व धर्मगुरु, डॉक्टर्स व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. राज्यस्तरीय अभियानाच्या शुभारंभासाठी मालेगाव शहराची निवड केल्याबद्दल आरोग्य विभागाचे जनतेच्या वतीने डॉ. सावंत यांनी आभार मानले. शहरासाठी असलेले उद्दिष्ट निश्चित पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. महिला व मुलांचे रुग्णालयासाठी अडीच कोटींचा निधी देण्यात आला असून, आरोग्यमंत्र्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची त्वरित नियुक्ती करावी व जिल्हास्तरीय रक्तपेढीची सुरु वात मालेगावी करावी, असे साकडे भुसे यांनी घातले.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास यांनी प्रास्ताविक केले. कोर्ट कचेरी व आजारामुळे घराची स्थिती खालावते असे दिसून येत आहे. त्यामुळे निरोगी घर संपन्नतेची साक्ष देत असल्यामुळे हे लसीकरण अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लहान मुले व गर्भवती महिलांनी लसीकरण करून घेत आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन व्यास यांनी केले.
प्रारंभी दीपप्रज्वलन तसेच लहान बालकांना लसीचे डोस पाजत मिशन इंद्रधनुष्य अभियानाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेणाºया वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविकांचा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मालेगावास महिला व मुलांचे रुग्णालय, परिचारिका महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल रुग्ण कल्याण समितीचे राजेश अलीझाड व दत्ता चौधरी यांनी डॉ. सावंत यांचे आभार मानून सत्कार केला.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती आशा आहिरे, अरुण लिंगायत, मनोहर बच्छाव, कृउबा उपसभापती सुनील देवरे, गटनेते नीलेश आहेर, विजय पोफळे, संजय दुसाने, रामा मिस्तरी, विनोद वाघ, जयप्रकाश बच्छाव, डॉ. दिलीप भावसार, उदय राहुरे, पं. स. सदस्य भगवान मालपुरे, कृष्णा ठाकरे, भिकन शेळके, ज्योती भोसले, जिजा बच्छाव, कल्पना वाघ, जिजाबाई पवार, प्रतिभा पवार, कविता बच्छाव, नारायण शिंदे, राजाराम जाधव, पप्पू पवार, पुष्पा गंगावणे, राजेश गंगावणे, आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे, डॉ. भीमराव त्रिभुवन, भारत बेद, कैलास पवार आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा वैद्यकीय अधीक्षक सुरेश वाघचौरे यांनी आभार मानले.
आरोग्यमंत्र्यांकडून आरोग्य कर्मचाºयांचा गौरव
आरोग्य विभागातील कर्मचाºयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात पंचायत समितीच्या कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, करंजगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहायक वासंती बागुल, पाडळदे उपकेंद्राचे आरोग्यसेवक प्रवीण खैरनार, अजंग उपकेंद्राचे आरोग्यसेवक राकेश पवार, जेऊर उपकेंद्राच्या आरोग्यसेविका सविता सानप, टिंगरी उपकेंद्राच्या आरोग्यसेविका उज्ज्वला गायकवाड, पोहाणे उपकेंद्राच्या आशा सेविका वैशाली सोनवणे, महापालिकेतील आयेशानगरच्या वैद्यकीय अधिकारी ज्योत्स्ना नानावटी, आयएमएच्या वैद्यकीय अधिकारी आमरा परवीन शकील अहमद, गोल्डननगरच्या आरोग्यसेविका सुरेखा जगताप, आशा सेविका समिरा मोहंमद अब्दुल्ला, सीएमसी शबीना निसार अहमद, सामान्य रुग्णालयातील परिचारिका एस. के. जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप खैरनार, मौलाना अब्दुल बारी, रोटरी क्लबचे डॉ. दिलीप भावसार यांचा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.