उद्योजकांना सुविधा पुरविण्यास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:46 AM2018-08-01T00:46:49+5:302018-08-01T00:47:17+5:30

नुकत्याच झालेल्या नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात होते. केलेल्या कामांच्या मुद्द्यावर आणि एकमेकांची उणीदुणी काढत ही निवडणूक यंदा चांगलीच गाजली. मोठ्या उद्योग घटकासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदाच्या जागेवर टीडीके इपकॉस कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा निमाचे माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी विजयी झाले.

Prefer to provide facilities to entrepreneurs | उद्योजकांना सुविधा पुरविण्यास प्राधान्य

उद्योजकांना सुविधा पुरविण्यास प्राधान्य

Next

नुकत्याच झालेल्या नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात होते. केलेल्या कामांच्या मुद्द्यावर आणि एकमेकांची उणीदुणी काढत ही निवडणूक यंदा चांगलीच गाजली. मोठ्या उद्योग घटकासाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदाच्या जागेवर टीडीके इपकॉस कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा निमाचे माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी विजयी झाले. त्यांच्याशी साधलेला संवाद....
प्रश्न- निमा निवडणुकीत मोठ्या कारखान्यांचे प्रतिनिधी थेट निवडणुकीत सहजासहजी भाग घेत नाहीत. पण तुम्ही घेतला?
- दोन वर्षांपूर्वी निमा कार्यकारिणीने ठराव करून मला अध्यक्षपद दिले. अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कारकिर्दीत आणि दुसऱ्या वर्षीदेखील पूर्ण निमा टीमने खूप चांगले काम केले. त्यामुळे त्याच टीमच्या आग्रहाखातर मी ही निवडणूक लढविली. मतदारांना केलेले काम चांगले वाटले असेल म्हणून त्यांनी पुन्हा विश्वास टाकला आहे. चांगल्या कामासाठी निवडणूक लढविणे काही गैर नाही.
प्रश्न- पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने नवीन योजना काय आहेत?
- दोन वर्षांत जी उद्दिष्टे होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी पूर्णपणे समाधानी नाही. सुरू केलेल्या कामांना गती देणे, उद्योजकांना मूलभूत सेवासुविधांसाठी पाठपुरावा करणे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पाठपुरावा करणे, नवीन तंत्रज्ञान, स्किल डेव्हलपमेंट यात खूप काम करण्यासारखे आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध क्लष्टरची निर्मिती करणे, उद्योजकांना बँका कर्जपुरवठा करण्यास अडचणी निर्माण करतात त्याकडे लक्ष देणे.
प्रश्न- तुम्ही एका गटाचे आणि अन्य पदाधिकारी दुसºया गटाचे आहेत. अशा वेळी कामात अडचणी येणार नाहीत?
- निवडणुकीपुरते गट-तट आणि मतभेद असावेत. दुसºया गटाचा अजेंडा निमाच्या हितासाठीच असणार आहे. अजेंडा वेगळा असला तरी शेवटी चर्चा करूनच निर्णय घेतले जातात. सभासदांचे व संस्थेचे हितासाठी मतभेद बाजूला ठेवणे गरजेचे असते.
प्रश्न- राजकीय पक्षांचे लोक निमात येणे कितपत योग्य?
- आपण मतदानाला जातो म्हणजेच प्रत्येक माणूस राजकारणी असतो. निमात पक्षीय राजकारण येणार नाही किंवा निमाचा वापर राजकीय पक्षांसाठी होणार नाही याची काळजी निमा सदस्यांनी घेतली पाहिजे. निमाचा गैरवापर होणार नाही याची अध्यक्ष म्हणून काळजी घेणार आहे.
प्रश्न- कामगार आणि व्यवस्थापन कलहात निमाची भूमिका काय?
- कोणत्याही कारखान्यात सुरुवातीला चांगले संबंध असतात. त्यात सुसंवाद संपला की ‘इगो’ जागा होतो. त्यामुळे संबंध ताणले जातात. अशावेळी त्रयस्थ म्हणून जरी निमाने पुढाकार घेतला तरी तो दोघांना मान्य होत नाही. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात चांगले संबंध असावेत, अशी निमाची भूमिका आहे. काही वाद निमाने निमा कार्यालयात सोडविले आहेतच.
 

Web Title: Prefer to provide facilities to entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.