हिंगणवेढे शिवारात कोबी लागवडीस प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:51 PM2020-07-08T21:51:41+5:302020-07-09T00:29:23+5:30
एकलहरे : परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर काही दिवस पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे ऊभे राहत असतानाच पावसाने चांगली हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकºयांत समाधान व्यक्त होत आहे.
एकलहरे : परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर काही दिवस पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे ऊभे राहत असतानाच पावसाने चांगली हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकºयांत समाधान व्यक्त होत आहे. एकलहरे, हिंगणवेढे परिसरात यंदा कोबी लागवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक शेतकºयांनी जूनच्या मध्यात कोबीची लागवड केली आहे. सध्या बºयापैकी पाऊस पडत असल्याने कोबीलाही नवसंजीवनी मिळाली आहे. उघडझाप करत पडणाºया पावसात शेतकरी कोबी पिकाला खताची मात्रा देण्यात व्यस्त आहेत. हिंगणवेढे परिसरातील अनेक शेतकºयांचा कल कोबी लागवडीकडे आहे.
या भागात फुलकोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राऊट या प्रकारच्या कोबीची लागवड केली जाते. जुलै ते आॅक्टोबर या काळात लागवड केल्यास बºयापैकी बाजारभाव मिळतो. त्यामुळे अगदी माळरानावरही कोबीची लागवड केलेली दिसून येते. त्यासाठी रब्बी हंगामात सप्टेंबर आॅक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात रोपे तयार करतात. तीन ते चार आठवड्यात रोपे लागडीयोग्य होतात. खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात कोबी लागवड केली जाते. आॅक्टोबर ते जानेवारी या कालावधीत लागवड केल्यास अधिक उत्पन्न मिळते. शेतमालाचा दर्जाही उत्तम राहातो. जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत लागवड केल्यास बºयापैकी बाजारभाव मिळतो असे शेतकरी सांगतात.
-----------------------
कोबीची लागवड हिंगणवेढे परिसरात मोठ्या प्रमाणात केली जाते. पानकोबी ही मोहोरी कुळातील असून, हे पीक कोबीचे प्रकार आणि मातीनुसार ५० ते ९० दिवसात तयार होते. टिकायला व वाहतुकीला सोईचे आहे. कोबीची भाजी पचनास हलकी असून, तिचा उपयोग सारक म्हणून केला जातो. पानकोबी, फुलकोबी हे प्रकार लागवडीसाठी अनुकूल असून, शेतकºयांना फायदेशीर ठरते.
- रमेश धात्रक, शेतकरी, हिंगणवेढ
---------------------
कोबी पिकासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब केल्यास पानकोबीचे सरासरी हेक्टरी ३० ते ५० टन उत्पादन मिळते. संकरित वाणाचे हेक्टरी ७५ ते ८० टनाहून अधिक उत्पादन मिळते. कोबीपासून मिळणारा पाला दुभती जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी वैरण म्हणून वापरता येतो.
- वाल्मीक धात्रक, शेतकरी, हिंगणवेढे