द्राक्षबागा तोडून डांगर लागवडीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:03+5:302021-06-18T04:11:03+5:30
द्राक्ष शेती ही संपूर्णपणे हवामान बदलावर अवलंबून असल्यामुळे अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना दिसत आहेत. हवामान बदलाचा ...
द्राक्ष शेती ही संपूर्णपणे हवामान बदलावर अवलंबून असल्यामुळे अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना दिसत आहेत. हवामान बदलाचा विचार करून दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील प्रयोगशील शेतकरी विलास दादाजी जाधव यांनी आपल्या दोन एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आणि डांगर लागवड करत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले.
जाधव यांनी द्राक्षबाग तोडल्यानंतर शेताची कोणतीही मशागत न करता तोडलेल्या द्राक्षवेलीची खुटके ट्रॅक्टरने काढून घेतले. त्याच द्राक्षवेलीच्या ठिकाणी डांगराचे बी टोभण्यात आले. बागेला ठिबक सिंचन असल्यामुळे तो खर्च करण्याची वेळ आली नाही. साधारणपणे दोन एकरांत दोन हजार डांगर बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड करण्यात आली. दोन सरींमधील अंतर ९ बाय ६ असल्यामुळे डांगर वेल जमिनीवर पसरण्यास कुठलीही गर्दी झाली नाही. त्यामुळे वेलीची वाढ अतिशय चांगली झाली. त्यात द्राक्षबागेला प्रत्येकवर्षी टाकलेले शेणखत, जैविकखत व रासायनिक खत यांचा डांगरवेलीला मोठा फायदा झाला. ८० दिवसांमध्ये डांगर काढण्यास तयार होऊन एका वेलीवर ७० ते ८० किलो माल मिळाला. सध्या सर्व डांगराची तोडणी झाली असून, ३५ ते ४० टन मालाची नाशिक मार्केटमध्ये हातविक्री होत आहे. डांगराला आठ ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. डांगर तोडणीनंतर दोन ते तीन महिने साठवून ठेवता येते. त्यामुळे बाजारभावानुसार मालाची विक्री करता येते. अतिशय कमी खर्चात विलास जाधव यांनी हे पीक घेतले आहे. ५ हजार २०० रुपयांच्या भांडवलामध्ये त्यांनी साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
कोट....
सध्याच्या परिस्थितीमध्ये हमीभाव नसल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. यासाठी शेतकरी वर्गाने कमी खर्चात जास्ती जास्त उत्पादन काढता येईल, अशा पिकांची लागवड करणे आवश्यक असून, काळाची पावले व हवामान बदलावर आधारित पिके काढण्याची तसेच अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- विलास जाधव, शेतकरी, करंजवण
फोटो- १७ दिंडोरी फार्मर
===Photopath===
170621\17nsk_32_17062021_13.jpg
===Caption===
फोटो- १७ दिंडोरी फार्मर