गरोदर, स्तनदा मातांना तूर्तास लस नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:18 AM2021-01-16T04:18:14+5:302021-01-16T04:18:14+5:30

--इन्फो-- ॲटोलॉक इंजेक्ट इंजेक्शनची मात्रा पॉइंट पाच मिली इतकी असणार आहे. इंजेक्शन भरताना पॉइंट पाच मिली होताच आपोआप इंजेक्शन ...

Pregnant, lactating mothers do not get vaccinated immediately | गरोदर, स्तनदा मातांना तूर्तास लस नाही

गरोदर, स्तनदा मातांना तूर्तास लस नाही

Next

--इन्फो--

ॲटोलॉक इंजेक्ट

इंजेक्शनची मात्रा पॉइंट पाच मिली इतकी असणार आहे. इंजेक्शन भरताना पॉइंट पाच मिली होताच आपोआप इंजेक्शन लॉक होणार आहे तर लस दिल्यानंतर तेव्हढेच इंजेक्शनची मात्र शरीरात गेल्यानंतरही इंजेक्शन ॲटो लॉक होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त मात्रा होण्याची कोणतीही शक्यता नाही.

--इन्फो--

लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक

लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांना लसीकरणासाठी बेालविले जाणार आहे. असे असले तरी ही पूर्णपणे ऐच्छिक असेल. --

--इन्फो--

पोलीस बंदोबस्त राहाणार

या लसीकरण मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात येणार आहे. ज्या केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे तेथे कुणीही त्रयस्थ व्यक्तीने प्रवेश करू नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. मोबाइलवर आलेला एसएमएस तसेच आरोग्य कर्मचारी असल्याची खात्री करून त्याला केंद्रात सोडले जाणार असल्याचे पेालीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

कोट

कोरोनाच्या संकटकाळात शासन आणि प्रशासनाने कोरोनाचे चांगले व्यवस्थापन करून काेरोनाला रोखले आहे. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे घडून आले. आता लसीकरणातही प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. आपण अनुभवातून शिकत असतो. कोरोनाकाळात आपणाला हे लक्षात आलेले आहे. लसीकरण मोहिमेलाही नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.

--कोट--

ग्रामीण भागात सहा केंद्रे

लसीकरण मोहिमेचे सहा केंद्रे ही ग्रामीण भागात आहेत. १९,४८८ आरोग्य कर्मचाऱ्यांची यासाठी नोंद करण्यात आलेली आहे. या केंद्रांवरील सर्व तयारी पूर्ण झाली असून, या केंद्राची पहाणी करण्यात आलेली आहे.

-लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद

--

Web Title: Pregnant, lactating mothers do not get vaccinated immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.