गरोदर मातांनाही घेता येणार लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:32+5:302021-07-08T04:11:32+5:30
नाशिक : गरोदर महिलांनाही कोरोना लस देण्यात यावी की नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम होता. मात्र आता इतरांप्रमाणे ...
नाशिक : गरोदर महिलांनाही कोरोना लस देण्यात यावी की नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम होता. मात्र आता इतरांप्रमाणे गरोदर महिलांनाही लस घेता येणार असल्याची सूचना आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लसीकरण गरोदर महिलांसाठी उपयोगाचं असून, त्यांनाही लस घेण्यास परवानगी देण्यात आली असल्याने गरोदर मातांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
देशात जेव्हापासून लसीकरण सुरू झाले आहे, तेव्हापासून गरोदर माता आणि स्तनपान करणार्या माता यांना लसीकरण केलं जावं अथवा जाऊ नये याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतांतर होते. परंतु आता मात्र केंद्र शासनाने याबाबतचे मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. त्यानुसार आता गरोदर असलेल्या महिला आणि स्तनपान देणाऱ्या लहान बाळांच्या माता यांनासुद्धा लसीकरण सुरू केलं जाणार आहे. कोरोनाच्या संक्रमणाचा धोका उद्भवण्याची भीती असणाऱ्या अनेक गरोदर महिला आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊ शकणार आहेत. त्यामुळे आई होऊ पाहणाऱ्या महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे. लसीकरणासाठीच्या ॲपवर नोंदणी करून किंवा घराजवळ असणाऱ्या लसीकरण केंद्रावर जाऊनही त्या लस घेऊ शकतात.
इन्फो
सामान्य लक्षणे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गरोदर महिलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याची बाब जाहीर केली. तसेच त्यांनी गरोदर महिलांच्या लसीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्याचे सांगितले. प्रत्येक औषधांचे आणि लसींचे जसे इतर सामान्य नागरिकांना परिणाम जाणवतात तसेच गरोदर मातांनाही जाणवतील. त्यात हात दुखणे किंवा अंगदुखी, हलकासा ताप यांसारखी लक्षणं जाणवू शकतील. अगदी क्वचित काही मातांना २० दिवसांपर्यंत ही छोटी लक्षणं जाणवू शकतील. अशा मातांना तात्काळ वैद्यकीय मदत घेऊन उपचार घेता येतील.
इन्फो
आरोग्य सुस्थितीत
गरोदर मातांसाठी असलेली सर्वांत मोठी काळजी म्हणजे त्यांचं बाळ. कोविड-१९ होऊन गेलेल्या ९५ टक्के मातांच्या बाळांचं आरोग्य सुस्थितीत राहिल्याचं आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे. गरोदर स्त्रीने लस घेतल्यावर नुकत्याच जन्मलेल्या या बाळांवर थेट होणारे परिणाम दिसून आलेले नाहीत. मात्र, बाळांवर या लशींच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास अजून तरी झालेला नाही.
इन्फो
३५ वर्षांवरील मातांनी घ्यावी काळजी
गरोदर मातांमध्येदेखील ३५ वर्षांवरील मातांनी लस घेताना त्यांना असलेल्या सहव्याधींची माहिती डॉक्टरांना देऊन त्यांच्या सल्ल्याने लस घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित गरोदर मातांनी ट्रीटमेंट सुरू असलेल्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेऊन लस घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे संबंधित महिलेला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास त्याबाबत वेळीच त्याची काळजी घेता येणार आहे.
-----------------
ही डमी आहे.