दिंडोरीत अवकाळीने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 09:26 PM2020-05-14T21:26:38+5:302020-05-14T23:59:16+5:30
दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बुद्रुक परिसरात बुधवारी (दि.१३) रात्री झालेल्या गारपिटीने शेतमालाचे होत्याचे नव्हते करून टाकल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नुकसानीची पाहणी करीत प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देत जास्तीत जास्त नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

उमराळेबुद्रुक, नाळेगाव परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाºयासह गारपीट झाली. गारपीट इतकी भयावह होती की, सर्वत्र बर्फाचा थर साचत सिमला-काश्मीर सदृश बर्फवृष्टी झाल्याचे दिसत होते. या गारपिटीने कोणत्याही झाडाला पाला शिल्लक राहिला नाही. द्राक्षाला फुटलेली पालवी पूर्ण नष्ट झाली. आंबेही पूर्ण गळून पडले.
कारले, भोपळे, गिलके, कोबी, फ्लॉवर, काकडी आदी सर्व भाजीपाल्याची पिके जमीनदोस्त झाली. कांद्याचे मोठे नुकसान झाले. अगोदरच कोरोनामुळे भाजीपाल्याला भाव नसताना सर्व पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. वादळी वाºयाने झाडांची पडझड झाली तसेच काही घरांचे पत्रे उडून जात नुकसान झाले.
-----------------------------
झिरवाळ यांच्याकडून पाहणी
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उमराळे येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकºयांना दिलासा दिला. नैसर्गिक आपत्तीत जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येऊन लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार कैलास पवार, कृषी अधिकारी अभिजित जमधडे, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष डॉ. पुंडलिक धात्रक, बाजार समिती संचालक रामदास धात्रक, कृष्ण धात्रक, मंडळ अधिकारी काकड, तलाठी भोये, कृषी सहायक ठाकरे, ग्रामविकास अधिकारी गावीत आदी उपस्थित होते.