खासगी प्रीपेड वाहनांना जागा : हेमंत गोडसे यांची मध्यस्थी रिक्षा स्टॅण्ड प्रकरणी प्रबंधक घेणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:24 AM2018-05-09T00:24:32+5:302018-05-09T00:24:32+5:30
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी रिक्षाचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांना दूरध्वनीवरून केली.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी रिक्षाचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांना दूरध्वनीवरून केली. येत्या दोन-तीन दिवसांत यासंदर्भात भुसावळ येथे संयुक्त बैठक होणार आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारातील रिक्षा रॅकमध्ये टप्प्याटप्प्याने लावलेले लोखंडी बॅरिकेड्स एकमेकांना जोडण्याचे काम रेल्वे प्रशासनाने चार दिवसांपूर्वी मध्यरात्री सुरू केले होते. सध्या रिक्षा रॅकमध्ये लोखंडी बॅरिकेड्स टाकल्याने चारच्या रांगेत रिक्षा उभ्या राहतात. लोखंडी बॅरिकेड्समुळे अडचण होत असल्याची अगोदरपासून रिक्षाचालकांची ओरड आहे. चार दिवसांपूर्वी लोखंडी बॅरिकेड्स जोडण्यासोबत पहिला रिक्षाचा रॅक पुढून-मागून लोखंडी खांब उभारून बंद करण्यात येत होता. रेल्वे प्रशासन प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाºया ओला, उबेर यांसारख्या वाहनांना रिक्षाच्या रॅकमध्येच जागा उपलब्ध करून देत असल्याचे रिक्षाचालकांच्या लक्षात येताच चांगलाच वादविवाद निर्माण झाला. गेल्या ४०-५० वर्षांपासून आम्ही व्यवसाय करीत असून, रेल्वे प्रशासन खासगी प्रवासी वाहतूक करणाºया कंपन्यांकडून पैसे घेऊन त्यांना रिक्षा रॅकची जागा उपलब्ध करून देत रिक्षाचालकांच्या पोटावर पाय देत आहे, असा आरोप करत लोखंडी बॅरिकेड्स जोडण्याचे काम रिक्षाचालकांनी बंद पाडले. सिन्नर फाटा बाजूकडील प्लॅटफॉर्म चारच्या बाजूला खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना जागा उपलब्ध करून द्या, रिक्षा रॅकमध्ये कोणत्याही परिस्थितीत जागा देऊ नये, अशी मागणी करत तीन दिवसांपासून रिक्षाचालकांनी बंद पुकारला आहे. यासंदर्भात गोडसे, नाशिकरोड रेल्वेस्थानक रिक्षा चालक-मालक युनियनचे संस्थापक माजी नगरसेवक सुनील वाघ, अध्यक्ष किशोर खडताळे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक जुबेर पठाण, रेल्वे पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांची संयुक्त बैठक झाली. गोडसे यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक आर. के. यादव, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रबंधक सुनील मिश्रा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सर्व परिस्थिती सांगितली. क्षाचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करून खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. रेल्वेस्थानकाच्या आवारात प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा-टॅक्सीचालक अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत असले तरी त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाला कुठलाही आर्थिक फायदा होत नाही. त्यामुळे रेल्वे बोर्डाने स्थानकाच्या आवारातील काही जागा खासगी प्रवासी वाहतूक करणाºया कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी प्रवासी वाहतूक कंपनीचे टेंडर झाले नसले तरी भविष्यात तसा निर्णय घेणे अपेक्षित आहे. रेल्वेस्थानकाबाबत भुसावळ मंडल कार्यालयाकडून निर्णय होत असल्याने स्थानिक अधिकारी हतबल असल्याने निर्णयास विलंब होत आहे.