प्रीमियम टूल्स कारखाना लवकरच सुरूहोणार

By admin | Published: August 19, 2014 12:35 AM2014-08-19T00:35:44+5:302014-08-19T01:21:34+5:30

प्रीमियम टूल्स कारखाना लवकरच सुरूहोणार

The premium tools factory will be set up soon | प्रीमियम टूल्स कारखाना लवकरच सुरूहोणार

प्रीमियम टूल्स कारखाना लवकरच सुरूहोणार

Next

सातपूर : गेल्या आठ महिन्यांपासून बंद पडलेला सातपूर येथील ‘प्रीमियम टूल्स’ कारखाना पूर्ववत सुरू करण्याबाबत कामगार उपआयुक्तांच्या दालनात कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात यशस्वी बोलणी झाली आहे. कारखाना पूर्ववत सुरू होणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील ‘स्नायडर’ कंपनी बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्यानंतर औद्योगिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच गेल्या आठ महिन्यांपासून प्रीमियम टूल्स कंपनी बंद पडलेली होती. कंपनी पूर्ववत सुरू करावी म्हणून नाशिक वर्कर्स युनियनने गेल्या एप्रिल महिन्यापासून कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. दरम्यानच्या काळात अनेक वेळा कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात बोलणी झाली, परंतु अपेक्षित तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे ही कंपनी पूर्ववत सुरू होईल की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
प्रीमियम टूल्स कंपनी सुरू करण्याबाबत कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी पुढाकार घेऊन नाशिक वर्कर्स युनियनचे डॉ. डी. एल. कराड, अ‍ॅड. आर. एस. पांडे, कंपनीचे अधिकारी श्याम केळुस्कर, रितेश गुळवे यांची बैठक घेऊन कंपनी पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारपासून कंपनीत साफसफाईचे काम सुरू आहे. १५ दिवसांत यंत्रांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम पूर्ण करून १ सप्टेंबरपासून पूर्ववत उत्पादन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी दिली. आठ महिन्यांपासून कंपनी बंद असल्याने कंपनीला पूर्वीच्या आॅर्डर्स मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय विद्युत मंडळाची कंपनीकडे जवळपास ५० लाखांची थकबाकी असल्याने विद्युत मंडळाला पत्र पाठवून थकबाकी भरण्यासाठी दोन-तीन टप्पे करून द्यावे असे सांगितले आहे. शिवाय आगामी तीन महिने कंपनीचे सुरळीत उत्पादन सुरू करावे त्यानंतर वेतनवाढीच्या करारावर चर्चा करण्यात येईल या तीन महिन्यांच्या काळात कामगारांना नियमित काम देण्याचे ठरले असल्याचेही जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The premium tools factory will be set up soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.