नाशिकमध्ये आता प्रिपेड टॅक्सी सेवा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:07 AM2018-01-12T00:07:07+5:302018-01-12T00:07:57+5:30

पंचवटी : प्रिपेड रिक्षांपाठोपाठ आता नाशिक शहरात आता प्रिपेड टॅक्सीही सुरू होणार असून तसा निर्णय नुकत्यात झालेल्या प्रादोशिक परिवहन प्राधीकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Prepaid taxi service will be started in Nashik | नाशिकमध्ये आता प्रिपेड टॅक्सी सेवा सुरू होणार

नाशिकमध्ये आता प्रिपेड टॅक्सी सेवा सुरू होणार

Next

पंचवटी : प्रिपेड रिक्षांपाठोपाठ आता नाशिक शहरात आता प्रिपेड टॅक्सीही सुरू होणार असून तसा निर्णय नुकत्यात झालेल्या प्रादोशिक परिवहन प्राधीकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्राधिकरणची बैठक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन विविध धोरणात्मक ठरावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आल्यानंतर शहरात येतात. त्यांना ऐच्छिक स्थळी आरामदायी व कोणत्याही प्रकारची फसवणूक न होता सुरक्षित प्रवासासाठी प्रायोगित तत्त्वावर प्रि-पेड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असून सदर केंद्रातून नाशिक-शिर्डी, सापुतारा, पिंपळगाव, सप्तशृंग गड, मनमाड, सिन्नर, इगतपुरी, शनिशिंगणापूर व शहरांतर्गत या मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील वाढती वाहनांची संख्या व प्रवाशांना देण्यात येणाºया सुखसुविधा, शहरातील वाढते प्रदूषण याबाबत सामाजिक जबाबदारी म्हणून प्राधिकरणाने जुन्या वाहनांच्या बाबतीतही निर्णय घेऊन राज्य परिवहन प्राधिकरणाने निर्देशित केल्यानुसार नाशिक प्राधिकरणाने सर्व मार्गावर चालणाºया कुलकॅब, रिक्षा, स्कूल बस व टुरिस्ट वाहनांची आर्युमर्यादा निश्चित केली आहे. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन स्मार्ट सिटी संकल्पनेस मदत होईल. यात रिक्षा २० वर्षे, कुलकॅब १२ वर्षे, स्कूलबस १५ तर टुरिस्ट ९ वर्षे अशी वाहनांची वयोमर्यादा निश्चित केली आहे. टुरिस्ट कॅब यांना परवाने देणे, नूतनीकरण करणे व न करण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना प्रदान केलेले अधिकार शिथिल करून ज्या कार्यालयात टुरिस्ट टॅक्सी नोंदणी करण्यात येईल त्या संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना अधिकार प्रदान करण्यात येणार आहे.
नविन रिक्षांना मिळणार परवाने
शहरात सध्या १९ हजार अधिकृत परवानाधारक रिक्षा संख्या आहेत. आता अ‍ॅटोरिक्षा, टॅक्सी नवीन परवाने जारी करण्यात येणार आहेत. मोटार वाहन कायद्यामधील तरतुदीनुसार रिक्षांच्या संख्येवर १९९७ पासून मर्यादा आणली होती, परंतु जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार अ‍ॅटोरिक्षांच्या परवान्यावरील निर्बंध उठविले असून त्यामुळे शहरातील बेरोजगार युवकांना परवाने मिळणे सोपे झाले आहे. यासाठी १० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.  कॅबधारकांना अतिरिक्त व्यवसाय व उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी महाराष्टÑ राज्यात मोटार कॅब संवर्गातील वाहनांवर जाहिराती प्रसिद्ध करता येणार आहे. सध्याचे शहरांचे होणारे प्रदूषण बघता वाहनांकडून सर्वाधिक प्रदूषण होते या कारणांमुळे बॅटरी संचलित वाहनांना सेवा म्हणून नोंदणी केली तर प्रदूषण कमी होईल व इंधन वापराच्या तुलनेत खर्चाचे व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरावे म्हणून बॅटरी संचलित वाहनांना सार्वजनिक सेवा म्हणून नोंदणी करता येईल. टुरिस्ट बस परवाने देणे, नाकारणे व नूतनीकरणाचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना प्रदान केल्याने या कामासाठी आता राज्यस्तरीय परिवहन कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. सार्वजनिक वाहन चालविण्याचा बिल्ला नसताना चालकाकडे वाहन चालविण्यास देणाºया मालकावर कारवाई करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अ‍ॅटोरिक्षा परवानाधारक व परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात स्थलांतरित झालेल्या परवानाधारकांचे परवाने संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्थलांतर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचा सुरक्षित व आरामदायी प्रवास व्हावा यासाठी इतर शहरातून वयोमर्यादा संपलेल्या वाहनांची नोंदणी आपल्या परिक्षेत्रात होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त नव्या वाहनांचे रूपांतर व नोंदणी होईल, या हेतूने स्कूल व्हॅन संवर्गात रूपांतर करण्यात आले आहे. कोणत्याही जुन्या गाड्या रूपांतरीत (कन्व्हर्ट) करता येणार नाहीत त्यामुळे नवीन वाहने घ्यावी लागतील तसेच एप्रिलपर्यंत सर्व स्कूलबस पिवळ्या रंगाच्या होतील,असे यावेळी सांगण्यात आले. शहरातून प्रवास करणाºया प्रवाशांना प्रवास करता यावा, यासाठी इलेक्ट्रॉनिक मीटरप्रमाणे प्रवास करता येणार आहे. नाशिकरोड, सीबीएस या भागात असे स्टॅण्ड करून प्रवाशांना सुविधा देणारे रिक्षाचालक मीटरप्रमाणेच पैसे आकारतील. मीटरप्रमाणे ज्या रिक्षा चालतील त्यांच्या वेगळ्या रांगा केल्या जाणार आहेत.

Web Title: Prepaid taxi service will be started in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक