मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:31 PM2019-10-22T22:31:29+5:302019-10-22T22:33:57+5:30

नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि.२४) होणाऱ्या जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमजोणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

Preparation of administration for counting | मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी

Next
ठळक मुद्देजिल्ह्णातील काही मतदारसंघांचे निकाल हे राज्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि.२४) होणाऱ्या जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमजोणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
शहरात इगतपुरीसह चारही मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे, तर उर्वरित मतदारसंघांची मतमोजणी त्या-त्या मतदारसंघात होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
मतमोजणी केंद्राच्या सुरक्षिततेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. सीसीटीव्हीसह सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश देण्यात आलेले आहे. जिल्ह्णात पंधरा ठिकाणी होणाºया मतमोजणीच्या नियोजनानुसार साधारणपणे एका मतदारसंघासाठी ४८ कर्मचारी लागणार आहेत.
जिल्ह्णातील काही मतदारसंघांचे निकाल हे राज्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचे आहे.
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्रे आहेत त्या ठिकाणचे सर्व मंडप हे वॉटरप्रुफ करण्यात आलेले आहेत.
मतमोजणी ही इमारतींमध्ये होणार असल्यामुळे यासर्व इमारती सुस्थितीत असल्याची पाहणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी
केली असून, निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच निवडणूक सुरक्षा पोलीस यंत्रणेकडूनदेखील सुरक्षितेतचा आढावा घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रेमतदारसंघ केंद्राचे ठिकाण
१) नांदगाव शासकीय नवीन समारत कार्यालय, नांदगाव
२) मालेगाव मध्य शिवाजी जिमखाना, श्रीरामनगर, मालेगाव.
३) मालेगाव बाह्ण महाराष्टÑ राज्य वखार महामंडळाचे गोडावून
४) बागलाण नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
५) कळवण पंचायत समिती सभागृह
६) चांदवड नवीन प्रशासकीय इमारत, मनपाडरोड, चांदवड.
७) येवला औद्योगिक प्रशिक्षक संस्था, बाभूळगाव बू.
८) सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर.
९) निफाड कर्मवीर गणपतराव मोरे महाविद्यालय, निफाड.
१०) दिंडोरी मविप्र महाविद्यालय, उमराळेरोड, दिंडोरी.
११) नाशिक(पूर्व) विभागीय क्रीडा संकुल, नवीन आडगाव नाका
१२) नाशिक(मध्य) मनपाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह
१३) नाशिक (पश्चिम) छत्रपती संभाजी स्टेडियम, अश्विनगर, सिडको.
१४) देवळाली विभागीय महानगरपालिका कार्यालय, नाशिकरोड.
१५) इगतपुरी शिवाजी स्टेडियम, कन्या शाळेजवळ, सीबीएस.

जिल्ह्णातील १५ विधानसभा मतदारसंघातून नशीब अजमविणाºया १४८ उमेदवारांचा फैसला ईव्हीएममध्ये बंद झाला आहे. सोमवारी सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता तमाम नाशिककरांचे लक्ष गुरुवारी होणाºया मतदमोजणीकडे लागले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेने बंडखोरी केल्यामुळे तेथील निकाल काय लागतो याकडेदेखील लक्ष असणार आहे.

Web Title: Preparation of administration for counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.