जगदंबा देवी मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 03:10 PM2019-09-26T15:10:49+5:302019-09-26T15:11:12+5:30
वणी : येथील जगदंबा देवी मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली असून २९ रोजी सकाळी ९ वाजुन ३० मिनिटांनी घटस्थापना करण्यात येणार आहे.
वणी : येथील जगदंबा देवी मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली असून २९ रोजी सकाळी ९ वाजुन ३० मिनिटांनी घटस्थापना करण्यात येणार आहे. जगदंबेला घटस्थापनेच्या दिवशी डोक्यावर पैठणी, चांदीची छत्री, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसुत्र, कपाळावर कोरीव कुंकु, खणाची चोळी, फुलांची सजावट, रांगोळी असे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. जगदंबा देवीची मूर्तीची उंची सात फुट असुन भगवतीला नऊ वार साडी व सव्वा मिटरची चोळी लागते. रोज विविध रंगाची वस्त्रे परिधान करण्यात येणार असुन नवमीला रात्री नऊ वाजता नवचंडी हवन करण्यात येणार आहे. दशमी म्हणजेच दसऱ्याला शहरातील प्रत्येक मंदिरावर ध्वजारोहण तसेच नवरात्र कालावधीत श्रीक्षेत्र आळंदी येथील प्रसिद्ध किर्तनकार यांचे देवी भागवत कथा, व किर्तन, जागर, भजन ,अशा विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे .भाविकांसाठी भक्तनिवास, महिलांसाठी वस्त्रांतर गृह ,वाहनतळ , पेशवेकालीन तलावतिर्थाची स्वछता पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी , नवस पुर्तीसाठी जागा आणि घटी बसणाºया महिलांसाठी मंडप ,पर्यायी विजपुरवठा व्यवस्था असे नियोजन आहे. प्रात: पहाटे विशेष पंचामृत महापुजा, अभिषेक आरती, दुपारी नैवेद्य आरती , सायं आरती असे नियोजन आहे . देवीचा पितळी मुखवटा सुशोभित पालखीत ठेवुन शहरातील प्रमुख मार्गावरून त्या पालखीची शोभायात्रा वाजत गाजत काढुन मानाच्या ठिकाणी विधीवत पुजन करून पालखी प्रवेश मंदिरात झाल्यानंतर आरती करण्यात येते अशी परंपरा आहे. आरोग्य सुविधा पिण्याचे पाणी परिसर स्वच्छता याबाबीची पूर्तता करण्यात आली आहे. भावभक्तीपूर्ण वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी जगदंबा देवी ट्र्स्ट व ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.