मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:23 AM2019-05-15T01:23:55+5:302019-05-15T01:25:27+5:30

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची २३ मे रोजी मोजणी होणार असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही सर्व तयारी १७ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या काटेकोर नियमांमुळे या निवडणुकीतून नाशिक व दिंडोरीला कोणता खासदार मिळणार हे समजण्यासाठी २६ मे ची पहाट उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Preparation for counting in the final phase | मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

googlenewsNext
ठळक मुद्देआनंदकर यांनी घेतला आढावानाशिकसाठी २७, तर दिंडोरीसाठी २५ फेऱ्या

नाशिक : लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची २३ मे रोजी मोजणी होणार असून, मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही सर्व तयारी १७ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या काटेकोर नियमांमुळे या निवडणुकीतून नाशिक व दिंडोरीला कोणता खासदार मिळणार हे समजण्यासाठी २६ मे ची पहाट उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मतमोजणी तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी मंगळवारी (दि.१४) अंबड येथील मतमोजणी केंद्राला भेट दिली. मतमोजणीला अवघ्या ९ दिवसांचा कालावधी उरला असून, या निवडणूक शाखेकडून मतमोजणीचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सील उघडले जाईल. आठ वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून, पहिल्यांदा टपाली मतमोजणीसोबतच ईटीपीबीएसद्वारे प्राप्त सैन्य मतदारांच्या मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात येईल.
त्यानंतर मतदान यंत्रांमधील मतमोजणीला सुरुवात होणार असून, ईव्हीएमनंतर व्हीव्हीपॅटची मोजणी होणार असून, सर्व मतमोजणी प्रक्रियेचे चित्रीकरणही केले जाणार असल्याचे आनंदकर यांनी स्पष्ट केले.
नाशिकची मतमोजणी २७ फेºयांमध्ये
नाशिक लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २७ फेºयांमध्ये होणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २५ फेºया होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या फेरीतील मतमोजणीची आकडेवारी संकलित करण्यात येणार असून, सहा विधानसभा मतदारसंघांची संबंधित फेरीची मतगणनेची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी त्या फेरीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या मतांचा तपशील घोषित केल्यानंतरच पुढीची फेरी सुरू होणार आहे.

Web Title: Preparation for counting in the final phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.