जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:46 AM2019-01-05T00:46:48+5:302019-01-05T00:47:04+5:30

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन व पूर्व तयारीसाठी जिल्हास्तरीय अध्यापक विज्ञान संघाची माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी चिंचोली येथील सर विश्वेस्वराय्या इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे बुधवारी (दि.२) सहविचार सभा घेत १६ ते १८ जानेवारीदरम्यान होणाºया जिल्हा विज्ञान प्रदर्शनाविषयी सूचना केल्या.

Preparation of district level science exhibition | जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची तयारी

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची तयारी

googlenewsNext
ठळक मुद्देसहविचार सभा : शिक्षणाधिकाऱ्यांनी केल्या शिक्षकांना सूचना

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन व पूर्व तयारीसाठी जिल्हास्तरीय अध्यापक विज्ञान संघाची माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी चिंचोली येथील सर विश्वेस्वराय्या इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे बुधवारी (दि.२) सहविचार सभा घेत १६ ते १८ जानेवारीदरम्यान होणाºया जिल्हा विज्ञान प्रदर्शनाविषयी सूचना केल्या.
जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी तथा जिल्हा विज्ञान समन्वयक के. डी. मोरे यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी तालुके, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था याविषयी अध्यापक संघाच्या प्रतिनिधींकडून नियोजनाची माहिती घेतानाच प्रशासकीय स्तरावरून त्यात सुधारणा सुचवल्या, तर आर. पी. पाटील यांनी प्रदर्शनाचे परीक्षण पारदर्शक करण्यासोबतच राज्यस्तरावर अधिकाधिक प्रतिकृतींचा समावेश करण्यासाठी मार्गदर्शन केले. राज्यस्तरावर जिल्ह्यातून मागील निवड झालेल्या प्रतिकृती तालुक्यातील विज्ञान अध्यापक संघाचे नियोजनावर चर्चा केली.
सहभागी तालुक्यांचा आढावा
शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी तालुके, विद्यार्थी शिक्षक संख्या याविषयी आढावा घेतानाच विज्ञान प्रकल्पांच्या प्रतिकृती व प्रदर्शनाचे नियोजन याविषयी माहिती घेतली.

Web Title: Preparation of district level science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.