पूर्व मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:54 PM2019-10-20T18:54:42+5:302019-10-20T18:57:41+5:30

नाशिक पूर्व मतदारसंघात तीन लाख ५४ हजार ३०३ मतदार असून, त्यात एक लाख ८४ हजार ७०७ पुरुष तर एक लाख ६९ हजार ५९२ महिला मतदारांचा समावेश असून, मतदारांसाठी ३११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे

Preparation of electoral system in East constituency | पूर्व मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता

पूर्व मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता

Next
ठळक मुद्देपावसात साहित्याचे वाटप : मतदान केंद्रे तयारमतदानासाठी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : सोमवारी होणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, त्यासाठी रविवारी पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. भर पावसातही मोठ्या उत्साहाने निवडणूक कर्मचाºयांनी आपल्या पथक प्रमुखासह हजर राहून निवडणुकीसाठी लागणारे साहित्य काळजीपूर्वक ताब्यात घेतले. मतदान साहित्यानिशी अधिकारी, कर्मचारी दुपारनंतर मतदान केंद्रावर रवाना झाले असून, त्यानंतर मतदान कक्षाची सज्जता पूर्ण करण्यात आली आहे.


नाशिक पूर्व मतदारसंघात तीन लाख ५४ हजार ३०३ मतदार असून, त्यात एक लाख ८४ हजार ७०७ पुरुष तर एक लाख ६९ हजार ५९२ महिला मतदारांचा समावेश असून, मतदारांसाठी ३११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली असून, रविवारी सकाळी आठ वाजेपासून पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचा-यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यासाठी हजारो कर्मचा-यांनी याठिकाणी हजेरी लावली. मतदान प्रक्रियेकरिता आवश्यक असलेले कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, शाई, व्हीव्हीपॅट, ईव्हीएम मशीन, मतदान कक्ष, पांढरी पावडर, टाचण्या, सुतळी, मेणबत्ती आदींसह अन्य निवडणूक साहित्याचे मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मतदान साहित्य वाटपात अडथळा नको म्हणून क्रीडा संकुलात दोन ठिकाणी मंडप उभारणी करण्यात येऊन जमिनीवर चटई टाकण्यात आली होती. तर मुख्य संकुलाच्या आवारात निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी आलेल्या कर्मचा-यांना बसण्यासाठी चटई तसेच खुर्च्यांची व्यवस्था केली होती. साहित्य घेण्यासाठी आलेल्या कर्मचा-यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. मतदान साहित्य वाटप करण्यात येणार असल्यामुळे सकाळपासून क्रीडा संकुलात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान साहित्य घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने कर्मचारी क्रीडा संकुलात रांगेने दुपारपर्यंत उभे होते. मतदान साहित्याचा ताबा घेतल्यानंतर मतदान कर्मचारी, अधिका-यांनी क्रीडा संकुलाच्या आवारातच जेवणासाठी आणलेले डबे खाल्ले. मतदान साहित्य व कर्मचा-यांना वाहून घेण्यासाठी एस.टी. बस व खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती. दरम्यान मास्टर ट्रेनर उद्या सोमवारी पहाटेपासून पूर्ण पंचवटी विधानसभा मतदारसंघात फिरून मशीनमध्ये अडचण निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी मदत करणार आहे. या पथकात बारा कर्मचाºयांचा समावेश आहे.

Web Title: Preparation of electoral system in East constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.