जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह आरोग्य उपकरणांची सज्जता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 06:45 PM2020-06-17T18:45:04+5:302020-06-17T18:47:14+5:30
नाशिक : महानगरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह सर्व अत्यावश्यक उपकरणांची सज्जता करण्यात आली आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील तापमानाची खात्री करूनच एकेकाला आत जाऊ देण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.
नाशिक : महानगरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह सर्व अत्यावश्यक उपकरणांची सज्जता करण्यात आली आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील तापमानाची खात्री करूनच एकेकाला आत जाऊ देण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारासह अत्यावश्यक आरोग्य उपकरणांची अपरिहार्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ही सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला आता कोरोनासोबत राहून स्वत:ला वाचवत जगणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनपेक्षा नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागणार आहे. अडीच महिन्यांनतर शासकीय कार्यालयातील कामकाजही हळूहळू सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यालय परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाºया प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग, नावनोंदणी करण्यात येऊ लागली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या बावीसशेहून अधिक झाली आहे. मालेगावात कोरोना आटोक्यात येत असताना नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे; परंतु आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, असे सांगत नागरिकांनी स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन शासन, प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व यंत्रणा कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध कामांत गुंतल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. एकमेकांच्या संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने शासकीय कार्यालयांतील उपस्थितीबाबतही शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे कार्यालयात केवळ पंधरा टक्केच उपस्थिती ठेवण्यात आली आहे; परंतु आता हळूहळू शासकीय कार्यालयातील कामकाजही पूर्वपदावर येत आहे. कामकाज सुरू झाले असले तरी कोरोनाचा धोका मात्र टळलेला नाही. त्या पाशर््वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व विभागांना भेटी देत संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करून स्वच्छता आणि कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांमध्येही सामाजिक अंतर ठेवावे. प्रवेशासाठी एकच मार्ग असावा, कार्यालय परिसरात स्वच्छता असावी, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवावे, तसेच येणाºया प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावी, अशा सूचनादेखील जिल्हाधिकाºयांनी केल्या.