खंडेराव महाराज यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 04:54 PM2019-12-10T16:54:14+5:302019-12-10T16:55:19+5:30
. पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरसगाव येथील श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे येथील गावकऱ्यांच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
.
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरसगाव येथील श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे येथील गावकऱ्यांच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.. पहाटे लंगर तोडण्याचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे. त्यामुळे या सार्वजनिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्र माला भाविकांनी हजेरी लावून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात आले आहे. शिरसगाव खंडेराव महाराज यात्रेनिमित्त मानाचा रथ दत्तात्रय भडांगे, भारत भडांगे व किरण भडांगे हे या रथाचे मानकरी असल्याने यांनी पूर्णपणे नवीन रथ तयार केला आहे. या रथाचे काम शिरसगाव येथील गणेश शिरसाठ यांनी केले आहे.