महाआरोग्य शिबिराची तयारी

By admin | Published: December 30, 2016 12:33 AM2016-12-30T00:33:33+5:302016-12-30T00:33:50+5:30

प्रचाररथातून जनजागृती : नोंदणी, प्राथमिक तपासणी क रण्याचे आवाहन

Preparation for the Medicity Camp | महाआरोग्य शिबिराची तयारी

महाआरोग्य शिबिराची तयारी

Next

नाशिक : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील गोल्फ क्लब मैदानावर होणाऱ्या महाआरोग्य शिबिर जय्यत तयारी सुरू असून, या शिबिरात विविध प्रकारच्या आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रि या मोफत करण्यात येणार आहे.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ७० ते ८० तज्ज्ञ डॉक्टर्स रु ग्णांवर उपचार व शस्त्रक्रि या करणार आहे. यात हृदयरोग, किडनीचे आजार मेंदुविकार, कॅन्सर, गर्भाशय, पोटाचे विकार, नेत्ररोग यांसारख्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी रुग्णांनी २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जवळील आरोग्य केंद्र, वॉर्ड, विभाग, गट व गण येथे रुग्णांनी नोंदणी व प्राथमिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शिबिरासाठी गोल्फ क्लब मैदानावर जोरदार तयारी सुरू असून, येथे वेगवेगळ्या आजारांवर उपचारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी संपूर्ण मैदानावर शामियाना उभारण्यात आला आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे स्वयंसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिरादरम्यान महत्त्वाचे योगदान देतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)प्रचाररथाचे उद्घाटन नाशिक शहरासह परिसरातील विविध भागांत शिबिराची माहिती पोहोचविण्यासाठी महाआरोग्य शिबिराचा प्रचाररथ तयार करण्यात आला असून, या प्रचाररथाचे आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी व भाजपाचे विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Preparation for the Medicity Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.