राष्टÑवादीची निवडणूक तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:55 AM2018-09-21T00:55:53+5:302018-09-21T00:56:27+5:30
नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही समाजाला न दुखावण्याचा हेतू ठेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने जिल्हा पदाधिकाºयांच्या केलेल्या नियुक्त्या म्हणजे आगामी निवडणुकीची तयारी मानली जात असून, या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून एकमेकांवर ‘चेकमेट’ ठेवण्याची खेळीही खेळण्यात आली आहे.
जातीय, भौगोलिक समीकरणे : एकमेकांवर पक्षांतर्गत ‘चेकमेट’पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने
नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही समाजाला न दुखावण्याचा हेतू ठेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने जिल्हा पदाधिकाºयांच्या केलेल्या नियुक्त्या म्हणजे आगामी निवडणुकीची तयारी मानली जात असून, या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्याची लोकसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून एकमेकांवर ‘चेकमेट’ ठेवण्याची खेळीही खेळण्यात आली आहे.
नाशिकच्या राष्टÑवादी कॉँग्रेसवर भुजबळ यांचे वर्चस्व निर्विवाद असल्यामुळे मुंबईतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नियुक्त्यांच्या घोषणा केल्या असल्या तरी, त्यास भुजबळ यांची संमती असल्याशिवाय ते होणे शक्य नसल्याचे नूतन पदाधिकारीही जाणून आहेत. पुढच्या वर्षी होणाºया लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या फेरबदलात सामाजिक, जातीय व भौगोलिक समीकरणाचा मेळ घालण्यात आला आहे.
नाशिक लोकसभेची जागा भुजबळ कुटुंबीयातील कोण लढविणार याबाबत कमालीची उत्सुकता व तितकीच गोपनियता पाळण्यात येत असली तरी, या लोकसभेत मोडणारे विधानसभेचे मतदारसंघ व त्यातील जातीय समीकरणे पाहता, कोंडाजी मामा आव्हाड यांना अध्यक्षपदी नेमण्यामागचा राष्टÑवादीचा हेतू लपून राहिलेला नाही. परंतु असे करत असताना विशिष्ट समाजाला झुकते माप दिल्याचा आक्षेप खोडून काढण्यासाठी विष्णुपंत म्हैसधुणे यांना कार्याध्यक्ष करून दोन समाजात समानता साधण्यात आली आहे.
असाच काहीसा प्रकार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादीकडून चांगली लढत देऊन दुसºया क्रमांकाची मते घेतली होती. गेल्या साडेचार वर्षांत पवार यांनी या मतदारसंघाशी आपली नाळ कायम ठेवल्यामुळे आगामी निवडणुकीतही त्याच उमेदवार असतील असे आत्तापासूनच गृहीत धरले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करून राष्टÑवादीने दोन्ही गोेष्टी साध्य केल्या आहेत.
दिंडोरी मतदारसंघात समाविष्ट तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या अधिक असून, त्या खालोखाल निफाड, येवला, चांदवड या मतदारसंघातील मराठा मतदारांची संख्या लक्षात घेता रवींद्र पगार यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. दरम्यान, या नवीन नियुक्त्यांबद्दल काही कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर प्रकट होताना दिसत आहे.पगार यांच्या कार्यकक्षेला मर्यादाभौगोलिक समतोल साधण्यात आला असला तरी, जिल्ह्याची गेल्या दोन टर्म एकतर्फी जबाबदारी पेलणाºया रवींद्र पगार यांच्याकडील जबाबदारी आता कमी करून एकप्रकारे त्यांच्या कार्यकक्षेला मर्यादा घालण्यात पक्ष यशस्वी झाला आहे. परंतु या पदांसाठी गेल्या वर्षभरापासून बाश्ािंग बांधून बसलेल्यांची पक्षाने ओढवून घेतलेली नाराजी दूर करण्याची जबाबदारी मात्र आता नूतन पदाधिकाºयांवर येऊन पडली आहे.