निवृत्तिनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी राहुल पाटील : प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी यात्रा करा; गर्दीचे नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:58 PM2018-01-06T23:58:52+5:302018-01-07T00:24:32+5:30

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारपासून सुरू होणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेला प्रारंभ होत असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

Preparation of Navratinath Maharaj Yatra: Rahul Patil The crowded planning continues | निवृत्तिनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी राहुल पाटील : प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी यात्रा करा; गर्दीचे नियोजन सुरू

निवृत्तिनाथ महाराज यात्रेची जय्यत तयारी राहुल पाटील : प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी यात्रा करा; गर्दीचे नियोजन सुरू

Next
ठळक मुद्देयंत्रणांनी पालिकेस सहकार्य करावे प्लॅस्टिकमुक्त, निसर्गपूरक यात्रा

त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारपासून सुरू होणाºया श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेला प्रारंभ होत असून, त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यात्रा प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी केले, तर यात्रा शांततेत व निर्विघ्न पार पाडण्यासाठी जनतेने व सर्व यंत्रणांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी शनिवारी (दि.६) त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात सर्व यंत्रणा अधिकाºयांच्या यात्रा नियोजन बैठकीत केले.
१२ जानेवारीला संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त लाखो भाविक श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याने होणाºया गर्दीचे नियोजन करून भाविकांना सुखसुविधा उपलब्ध करून देत यंदाची यात्रा प्लॅस्टिकमुक्त निर्मळवारी व पर्यावरणपूरक करण्यासाठी येणाºया भाविकांकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करून प्लॅस्टिकमुक्त यात्रा, निसर्गपूरक यात्रा करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी राहुल पाटील बैठकीत केले. बैठकीस तहसीलदार महेंद्र पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्यामराव वळवी, श्रीसंत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंडगे आदी उपस्थित होते. नगरपालिकेने त्र्यंबक शहरात व वनविभागाने फेरी सुरू होणाºया वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यावर (फेरीमार्ग) कापडी किंवा कागदी पिशव्या उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभी करण्याची सूचना करून प्लॅस्टिकमुक्त यात्रा करण्याच्या सूचना केल्या. संत निवृत्तिनाथांची यात्रा पर्वकालाच्या पार्र्श्वभूमीवर शासकीय पातळीवर नियोजनाचा आढावा घेतला. या वर्षापासून संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा आपल्या सर्वांच्या सहभागाने निर्मलवारी म्हणून पार पाडत आहोत, त्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करून काम करण्याचे आवाहन केले. शहरात आलेल्या भाविकांना त्र्यंबक नगर परिषदेतर्फे मूलभूत सुविधा देण्यासाठी पालिकेस सर्वच यंत्रणांनी सहकार्य करावे आदी सूचन करून उपस्थितांचे आभार मानून शेवटी त्र्यंबकेश्वरमध्ये भरणारी वर्षातील सर्वात मोठी संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा निर्मलवारी म्हणून पार पाडण्याचे आवाहन
केले.
सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना
नियोजनाबाबत असलेल्या बैठकीत त्र्यंबकेश्वर देवस्थानास प्रांताधिकारी यांनी कुशावर्त तीर्थावर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करून मंदिर परिसरात होणाºया गर्दीचे नियोजन करण्याबरोबरच दुर्दैवाने अपघातप्रसंगी मंदिरातून भाविकांना बाहेर पडण्याचा मार्ग तयार करण्याच्या सूचना केल्या. परंतु या आर्थिक विषयाशी निगडीत असलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी विश्वस्त मंडळ काय कारवाई करणार यासाठी विश्वस्त उपस्थित राहणे गरजेचे असताना कर्मचारी पाठविला. याबाबत प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य यांच्याशी चर्ची केली असता आम्ही फक्त विश्वस्तांच्या कानी टाकू असे सांगितल्याने कुशावर्त तीर्थावर सीसीटीव्ही बसणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

Web Title: Preparation of Navratinath Maharaj Yatra: Rahul Patil The crowded planning continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा