शिवानीदीदी यांच्या व्याख्यानाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:42 PM2020-03-04T23:42:26+5:302020-03-04T23:45:09+5:30
नाशिक : अत्यंत सुमधुर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या हृदयात आदरभाव असलेल्या प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे ‘रिश्तो मे मधुरता’ या विषयावरील व्याख्यानासाठीची तयारी बुधवारीच पूर्ण करण्यात आली. गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या अमृतवाणीची अनुभूती प्रवेशिकाधारकांना घेता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अत्यंत सुमधुर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या हृदयात आदरभाव असलेल्या प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे ‘रिश्तो मे मधुरता’ या विषयावरील व्याख्यानासाठीची तयारी बुधवारीच पूर्ण करण्यात आली. गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या अमृतवाणीची अनुभूती प्रवेशिकाधारकांना घेता येणार आहे.
ब्रह्माकुमारीज नाशिक, लोकमत सखी मंच, लोकमत भक्ती यू-ट्यूब चॅनल आणि दीपक बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ५) जगप्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
शिवानीदीदी यांचे व्याख्यान ‘रिश्तो में मधुरता’ या विषयावर रंगणार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांनी अनेक वर्षांपासून जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावशाली आणि अनुभवपूर्ण मार्गदर्शन केले आहे. शिवानीदीदी यांचे भाष्य करण्याची पद्धत आणि समस्यामुक्तीबाबतचा प्रभावी सल्ला हजारो नागरिकांना उपयुक्त ठरला आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली होती. प्रदीर्घ कालावधीनंतर ब्रह्माकुमारी परिवार आणि सामान्य नागरिकांसाठी या व्याख्यानाचा योग जुळून आला आहे. शिवानीदीदी यांचा सामान्यपणे पुन्हा त्याच शहरात व्याख्यान करण्याचा योग फार कमी असतो. मात्र, नाशिककरांसाठी ही संधी चालून आली आहे. हा कार्यक्रम केवळ प्रवेशिका संकलित केलेल्या व्यक्तींसाठीच खुला आहे. त्यामुळे प्रवेशिका असलेल्या नागरिकांनी सायंकाळी ५ वाजेपूर्वी कार्यक्रमास उपस्थित राहून आसनस्थ होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी कार्यक्रमास येताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करावा, असे नमूद करण्यात आले आहे.
लोगो आणि फोटो
कालच्या पान ८ वरील बातमीतूनच फोटो आणि लोगो वापरावा. पार्किंग आणि प्रवेश पासधारकांपैकी महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अर्थात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी प्रवेश व्यवस्था ही इदगाह मैदानाच्या गेस्ट हाउसकडील गेटमधून करण्यात आली आहे, तर इतरांची प्रवेशव्यवस्था हॉटेल राजदूतकडून करण्यात आली आहे. तसेच सर्व पार्किंग व्यवस्था हॉटेल राजदूतकडील भागात करण्यात आली आहे.