श्रींच्या आगमनासाठी सज्जता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 09:42 PM2020-08-19T21:42:03+5:302020-08-20T00:15:48+5:30
मालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास बंदी असली तरी श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या पूजासाहित्य व श्रींची मूर्ती घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास बंदी असली तरी श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या पूजासाहित्य व श्रींची मूर्ती घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.
गणेश चतुर्थीला घरोघरी विधिवत पूजन करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी बाजारपेठेत ठिकठिकाणी पूजा साहित्य विक्रीची दुकाने सजली आहेत. तसेच गणेशमूर्ती व्रिकीचे स्टॉल थाटले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसा-गणिक वाढत असताना विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. कोरोनापासून सगळ्यांचे रक्षण करावे, असे साकडे बाप्पाला घातले जाणार आहे. पर्यावरणपूरक शाडू-मातीच्या गणेशमूर्तींची दुकाने लागली आहेत. १ शहरात मोसमपूल, सटाणा नाका, रामसेतू परिसरात गणेशमूर्तींची दुकाने थाटण्यात आली आहेत. कोरोनामुळे आरास व मोठे मंडप उभारले जाणार नसले तरी घरगुती व छोट्या-मोठ्या मंडळांनी तयारी सुरू केली आहे. शहरात कंटेन्मेंट झोनवगळता सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी देणार आहे. घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट व सार्वजनिक गणेश मंडळासाठी ४ फुटी मूर्ती बंधनकारक करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांचा मंडप १० बाय १० फूट असणे गरजेचे आहे.२ सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंध असून, मंडपात मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज बंधनकारक आहे. डीजेला बंदी आहे. शहरात सायं. ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे गणेश-भक्तांमध्ये नाराजी आहे. गणेशभक्तांवर संचारबंदी काळात कारवाई करू नये, अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस व मनपा प्रशासनाकडे केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात विसर्जन घरात किंवा पालिकेने उभारलेल्या तात्पुरत्या गणेशकुंडात करावे. कोरोनायोद्ध्यांना श्रद्धांजलीशहरातील नवा होळी चौकातील त्रिशुळ मंडळातर्फे सालाबादप्रमाणे श्रींची स्थापना केली जाणार आहे. कोरोनामुळे केवळ सकाळ, सायंकाळ महाआरती करण्यात येणार आहे. इतर धार्मिक कार्यक्रमांना फाटा दिला जाणार आहे. संचारबंदी उठल्यास आरासच्या दिवशी कोरोना आजारामुळे शहीद झालेल्यांना डिजिटल बॅनरद्वारे अभिवादन केले जाणार असल्याची माहिती मंडळाचे जयेश कैचे यांनी दिली.
परंपरा होणार खंडित
कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात मंडळ असल्याने यंदा कोणतीही आरास, देखावे केले जाणार नाही. शासनाच्या नियमानुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. ४ फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापन केली जाणार आहे. सर्व कार्यक्रम यंदा स्थगित करण्यात आले आहे. कोरोनामुळे २५ वर्षांपासूनची आरासची परंपरा खंडित होणार असल्याचे सम्राट मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष परदेशी यांनी सांगितले.