सिन्नर येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:35 PM2018-10-28T16:35:57+5:302018-10-28T16:56:32+5:30
सिन्नर : येथील आडवा फाटा मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (दि. ३१ ) पासून कबड्डी स्पर्धेस प्रारंभ होत आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सिन्नरच्या वंजारी समाज मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली असून स्पर्धेसाठी सिन्नर शहर व तालुका सज्ज झाला आहे.
सिन्नर : येथील आडवा फाटा मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (दि. ३१ ) पासून कबड्डी स्पर्धेस प्रारंभ होत आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सिन्नरच्या वंजारी समाज मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली असून स्पर्धेसाठी सिन्नर शहर व तालुका सज्ज झाला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर यांच्या सौजन्याने ६६ वी वरिष्ठ गट पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सिन्नर येथील आडवा फाटा मैदानावर होणार आहे.
नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व सह्याद्री युवा मंच, सिन्नर या संस्थेच्या वतीने या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही पाच दिवस चालणार आहे. त्यासाठी मैदानाची तयारी व आसनव्यवस्था करण्यात येत आहे. मैदानावर एकाच वेळी सहा सामन्यांचा थरार रंगणार आहे. पाच दिवसात सुमारे ५० ते ६० हजार प्रेक्षकांची उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आसनव्यवस्थेच्या मधोमध स्पर्धेसाठी मातीची सहा मैदाने असणार आहेत. या मैदानांत एकाच वेळी कबड्डीच्या सहा स्पर्धा होणार आहेत. प्रेक्षक गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रवेशद्वारावर मोठी कमान उभारण्यात येत आहे. प्रेक्षक गॅलरीसह भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. दिवसरात्र सत्रात होणाऱ्या स्पर्धेसाठी दररोज १० हजार प्रेक्षक हजेरी लावण्याची शक्यता आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या सहभाग असलेल्या कबड्डीचा थरार रिप्लेसह बघता यावा यासाठी मोठया स्क्र ीनची देखील व्यवस्था करण्यात येणार असून या सर्व कामांनी सद्या वेग घेतला आहे.
यास्पर्धेत राज्यातून पुरूषांचे २५ तर महिलांचे २० संघ सहभागी होणार आहेत. जवळपास ५४० पुरूष व महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच राज्यभरातून ७० पंच स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या मैदानांवर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतून निवडला जाणारा पुरूष व महिला संघ ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
चौकट - स्पर्धेसाठी उभारण्यात येणाºया क्रीडा नगरीची तयारी सुरू झाली असून सुसज्ज असे स्टेडीयम आडवा फाटा मैदानावर साकारण्यात येत आहे. या स्पर्धा एकुण सहा मैदानांवर पार पडणार असून त्यासाठी सहा कबड्डी मैदानांची जय्यत तयारी सुरू आहे. प्रेक्षक गॅलरी, विशेष अतिथी साठीची प्रेक्षक गॅलरी, मुख्य स्टेजची उभारणी सुरू असून मैदानाला तीन मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येत आहेत.
चौकट -सांस्कृतीक कार्यक्र ामांची मेजवणीया कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून सिन्नरकरांना खेळासोबतच मनोरंजनाचा देखील लाभ मिळणार आहे. त्यासाठी भव्य स्टेजची उभारणी करण्यात असून १ नोव्हेंवर रोजी ‘चला हवा येउ द्या’ फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा कार्यक्र म तसेच २ व ३ नोव्हेंबरला नाशिक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतीक कार्यक्रम यावेळी पार पडणार आहेत.