नाशिक जिल्ह्यात राज्य कर्मचारी संपाची तयारी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 04:06 PM2018-08-01T16:06:26+5:302018-08-01T16:08:33+5:30
संघटनेचे नेते अविनाश दौंड यांनी नाशिकला भेट देवून त्यांच्या उपस्थितीत सिडीओ मेरी, सेल्स टॅक्स, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन या ठिकाणी द्वारसभा घेण्यात येवून त्यात ७ ते ९ आॅगष्ट दरम्यान होणा-या राज्यव्यापी संपात सहभागी होवून संप
नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षााच्या निषेधार्थ राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी येत्या ७ ते ९ आॅगष्ट या दरम्यान राज्यव्यापी संपाची हाक दिली असून, हा संप यशस्वी करण्याच्या दृष्टीने कर्मचारी संघटनेच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर द्वारसभा घेवून कर्मचा-यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
संघटनेचे नेते अविनाश दौंड यांनी नाशिकला भेट देवून त्यांच्या उपस्थितीत सिडीओ मेरी, सेल्स टॅक्स, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन या ठिकाणी द्वारसभा घेण्यात येवून त्यात ७ ते ९ आॅगष्ट दरम्यान होणा-या राज्यव्यापी संपात सहभागी होवून संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. सातवा वेतन आयोगाचीप्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ लागू करावी तसेच जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची १४ महिन्यांची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासूनचा वाढीव महागाई भत्ता त्वरीत मंजूर करण्यात यावा, अंशदायी पेन्शन योजना बंद करून १९८२ ची परिभाषित पेन्शन योजना लागू करावा, सर्व संवर्गातील रिक्तपदे तात्काळ भरण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांना किमान वेतन दे-यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा, पाच दिवसांचा आठवडा लागू करा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असून, यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन दिलीप थेटे, महेश आव्हाड, सुनंदा जरांडे, उत्तम गांगुर्डे, ज्ञानेश्वर कासार, राजेंद्र अहिरे आदींनी केले आहे.