विश्वशांती अहिंसा संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:37 AM2018-10-19T01:37:42+5:302018-10-19T01:38:16+5:30
प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरम येथे येत्या २२ आॅक्टोबरपासून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणाºया विश्वशांती अहिंसा संमेलनाची प्रशासनातर्फे जोरदार तयारी सुरू असून, भव्य सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सटाणा : प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील ऋषभदेवपूरम येथे येत्या २२ आॅक्टोबरपासून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणाºया विश्वशांती अहिंसा संमेलनाची प्रशासनातर्फे जोरदार तयारी सुरू असून, भव्य सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दि. २२ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत तीन दिवसांचे विश्वशांती अहिंसा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी दहा हजार भाविकांसाठी भव्य सभामंडप उभारण्याचे काम सुरू आहे. २३० बाय २६० चौरसफुटाचा पेंडॉल उभारण्यात आला आहे. संमेलन स्थळाला भरत चक्र वर्ती उद्यान असे नाव देण्यात आले आहे. या उद्यानातील पेंडॉल मध्ये ५२ बाय २० चौरस फुटाचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. व्यासपीठासमोरील जागेत भाविकांसाठी सहा सेक्टर तयार करून आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा संपूर्ण पेंडॉल अग्नी व पाणीरोधक तयार करण्यात आला आहे. या कार्यक्र मासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येत्या २२ आॅक्टोबरला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या सोबत अनेक व्हीआयपी कार्यक्र मासाठी हजेरी लावणार आहेत. यामुळे हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी बारा एकर जागेवर पाच हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासोबत डझनभर मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे हेलिपॅडसाठी अतिरिक्त पर्यायी जागा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संमेलनासाठी पंचवीस हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.