बुवाजी बाबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:36 PM2019-03-05T22:36:48+5:302019-03-05T22:37:08+5:30
निºहाळे : नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येत्या गुरुवारपासून (दि.७) यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणारी पालखी मिरवणूक यात्रेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या प्रारंभाला दोन दिवस श्रीक्षेत्र बुवाजी बाबांचा यात्रोत्सव भरतो. निºहाळे येथे सुरुवातीला बुवाजी बाबांच्या केवळ पादुकावजा मंदिर होते. सन २००४ साली मंदिराचे पुजारी महंत बबन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बुवाजी बाबांचे मंदिर साकारले आहे. तेव्हापासून या यात्रोत्सवाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी येथे यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
यावर्षी ७ व ८ मार्च रोजी दोन दिवसीय यात्रोत्सव भरणार आहे. गुरुवारी प.पू. बुवाजी अहिलाजी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता बुवाजी बाबा यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता हभप किसन महाराज काकड यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (दि.८) सकाळी १० वाजता हभप महंत उद्धव महाराज मंडलिक (तुकाराम महाराज संस्थान, नेवासे) यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद व देवाचा कार्यक्रम होणार आहे.
दिवसेंदिवस यात्रेला भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यभरातून भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवास विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन बुवाजी पुणेकर, महंत बबन सांगळे, सोमनाथ सांगळे, उमाजी पुणेकर, भीमाजी पुणेकर, विष्णू सांगळे, ज्ञानदेव सांगळे यांच्यासह निºहाळे-फत्तेपूर ग्रामस्थांनी केले आहे.