महापुराची पूर्वतयारी अधिक गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 04:33 PM2020-06-20T16:33:20+5:302020-06-20T16:34:36+5:30

चांदोरी : चांदोरी सह संपूर्ण गोदाकाठच्या १९ ते २० गावांना महापुराचा फटका बसत असतो या महापुरामूळे शेती,छोटे-मोठे व्यवसायिक, दुकानदार, दूध संकलन केंद्र यांना मोठया प्रमाणत आर्थिक झळ सोसावी लागते तर मोठया प्रमाणात वित्तहानी होते.

Preparations for floods are more rapid | महापुराची पूर्वतयारी अधिक गतीमान

महापुराची पूर्वतयारी अधिक गतीमान

Next

चांदोरी : चांदोरी सह संपूर्ण गोदाकाठच्या १९ ते २० गावांना महापुराचा फटका बसत असतो या महापुरामूळे शेती,छोटे-मोठे व्यवसायिक, दुकानदार, दूध संकलन केंद्र यांना मोठया प्रमाणत आर्थिक झळ सोसावी लागते तर मोठया प्रमाणात वित्तहानी होते.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक शहरात जोरदार पाऊस झाला की गंगापूर अन् दारणा धरणातून मोठया प्रमाणात विसर्ग केला जातो व शहरातील पाणी त्यात मिळसले, ते पाणी वाहत थेट गोदाकाठावरील गावात शिरते व जनजीवन विस्कळीत होते.
दरवर्षी जिल्हा व तालुका प्रशासन पूरपरिस्थितीबाबत आढाव घेऊन व योजना तयार करत असते. पुरेषेत राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करणे व त्यांना सूचना देत अन्न पुरवठा करणे तसेच कोणी कुठे अडकलेले असेल त्यांचे रेस्क्यूव करणे, औषध पुरवठा सुरळीत ठेवणे अशी कामे प्रशासन करत असत.
या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून चांगल्या पावसाला सुरु वात झाली. काही गावातले ओहळ, नाले भरभरून वाहत आहे. मागील महिन्यात प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील यांनी पूररेषेत असलेल्या गावाचा आढावा घेतला. तसेच गोदाकाठ भागात पुरपरिस्थिती देवदूत म्हणून काम करणाºया आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांच्या अडचणी जाणून घेतल्या व पूरपरिस्थिती बचाव करण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी आपत्ती व्यवस्थापन समितीने केली आहे.
दरवर्षी पुररेषेत राहणाºया नागरिकांना पुर परिस्थिती निर्माण झाल्यावर जवळपास १०० ते २०० कुटुंबियांचे स्थलांतर केले जाते, परंतु या वर्षी कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार केला आहे, याचमुळे स्थलांतरित लोकांना एकत्र ठेवता येणार नाही. यावर उपाय काढत प्रशासनाच्या वतीने जूनच्या पहिल्या आठवड्यात पुररेषेत राहणाºया नागरिकांना प्रत्येकाने स्वत:च्या मार्गाने स्थलांतर होऊन सुरक्षित स्थळी निघून जावे असे आवाहन करण्यात आले आहे, तसेच नोटीस देण्यात आली आहे.
तसेच नागरिकांना पाण्याच्या निसर्गाबाबत वेळोवेळी माहिती देण्यासाठी नियोजन केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन समितीने पूरपरिस्थिती बचाव करण्यासाठी लागणाºया यंत्र व इतर साहित्याची तपासणी व प्रात्यक्षिके व सराव करून पूर्व तयारी केली आहे.
निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी शुक्रवारी(दि.१९ जून) गोदाकाठच्या गावातील ग्रामसेवक व सरपंच यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन पूराच्या पूर्वतयारी बाबत आढाव घेतला. तसेच नेहमीच गोदावरी पुर पाण्याला अडसर निर्माण करणाºया पानवेली देखील जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यास सुरु वात करण्यात आली आहे.

चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे ३० स्वयंसेवक पूरपरिस्थितीत कसे बचाव कार्य करावे तसेच सराव करत आहे. समिती बाळू आंबेकर यांनी समिती पूरपरिस्थितीत काम करण्यासाठी सज्ज असल्याने सांगितले.
पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून तसेच पुरेषेत राहण्याºया नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातील.प्रशासनाने पूरपरिस्थितीची पूर्व तयारी पूर्ण केली आहे व नागरिकांनी सहकार्य करावे.
- दीपक पाटील, तहसीलदार, निफाड.
चांदोरी व सायखेडा गटातील सर्व गावांचा पूरपरिस्थिती बाबत आढाव घेतला आहे. त्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक याची बैठक घेत सूचना दिल्या आहे.
-दिलीप बनकर, आमदार, निफाड तालुका.

Web Title: Preparations for floods are more rapid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.