गणेश विसर्जनासाठी  पंचवटीत जय्यत तयारी ; शेकडो  मंडळे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:59 AM2018-09-23T00:59:28+5:302018-09-23T00:59:45+5:30

गणेश विसर्जनासाठी पंचवटीतील शेकडो गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून, पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा सुरक्षा टिकून राहावी यासाठी मिरवणूक मार्गावर पोलीस बळ तैनात करण्यात आलेले आहे,

Preparations for Ganesh immersion in Panchavati; Hundreds of circles ready | गणेश विसर्जनासाठी  पंचवटीत जय्यत तयारी ; शेकडो  मंडळे सज्ज

गणेश विसर्जनासाठी  पंचवटीत जय्यत तयारी ; शेकडो  मंडळे सज्ज

Next

पंचवटी : गणेश विसर्जनासाठी पंचवटीतील शेकडो गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून, पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा सुरक्षा टिकून राहावी यासाठी मिरवणूक मार्गावर पोलीस बळ तैनात करण्यात आलेले आहे, तर महापालिका प्रशासनाच्या वतीने कृत्रिम तलाव तसेच लहान मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था पंचवटीत जागोजागी करण्यात आलेली आहे.  महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. प्रशासनाकडून पंचवटी परिसरातील राजमाता मंगल कार्यालयाजवळ, गोरक्षनगर (दत्त चौक), आरटीओ कॉर्नर, कोणार्क नगर, नांदूर घाट, तपोवन कपिला संगम, नारोत्तम भवन पंचवटी कारंजा तसेच गोदापार्क रामवाडी याठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे, तर सीतासरोवर, नांदूर गोदावरी, आडगाव पाझर तलाव, तपोवन कपिला संगम, रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा नैसर्गिक तलाव आहे.
गणेश विसर्जन स्वच्छतेसाठी व निर्माल्य संकलनासाठी एकूण १४८ स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले असून, प्रत्येक स्पॉटवर निर्माल्यासाठी २ घंटागाड्या अशा एकूण ३९ वाहनांची व्यवस्था केली आहे. प्रसादासाठी वेगळे प्रसाद पात्र व्यवस्था तसेच निर्माल्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले असून भक्तांनी निर्माल्य नदीत न टाकता मनपा स्वच्छता कर्मचारी किंवा निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन केले आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने पंचवटीतील मिरवणूक मार्गावर तसेच गंगाघाट, म्हसोबा महाराज पटांगण परिसरात पोलीस बळ तैनात करण्यात येणार आहे.
कार्यकर्त्यांचा हिरमोड  वाढते ध्वनिप्रदूषण लक्षात घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डिजे साउंड लावण्यास परवानगी नसल्याने अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला आहे. अनेक मंडळांनी ऐनवेळी डिजे साउंड रद्द करून त्याऐवजी ढोल-ताशे तसेच बँड पथक ठरविले आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात पोलिसांनी त्या त्या भागातील मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोलावून डिजे न लावण्याबाबत सूचना देऊन जी मंडळे नियमांची पायमल्ली करतील त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.
नाशिकरोडला अखेरच्या दिवशी भाविकांची गर्दी
श्री गणेशोत्सवाच्या देखावे बघण्याच्या अखेरच्या दिवशी भाविक, महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. तर श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मनपा व पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
४श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारनंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने नाशिकरोड-पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचलन करण्यात आले. पर्यावरण व नदीचे प्रदुषण रोखण्याकरिता मनपा प्रशासनाच्या वतीने दत्तमंदिररोड मनपा शाळा १२५ चे क्रीडांगण, शिखरेवाडी क्रीडांंगण, जयभवानीरोड जेतवन नर्सरी, जेलरोड नारायणबापू चौक, चेहेडी ट्रक टर्मिनस या पाच ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: Preparations for Ganesh immersion in Panchavati; Hundreds of circles ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.