वावी ते श्रीक्षेत्र मढी पदयात्रेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:20 AM2018-03-01T00:20:50+5:302018-03-01T00:20:50+5:30

रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असून, यानिमित्त तयारी करण्यात येत आहे.

Preparations for the journey from Vavi to Shrikhetra Madi | वावी ते श्रीक्षेत्र मढी पदयात्रेची तयारी

वावी ते श्रीक्षेत्र मढी पदयात्रेची तयारी

googlenewsNext

वावी : रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असून, यानिमित्त तयारी करण्यात येत आहे.  वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराजांची श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. रंगपंचमीच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षी धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात वावी येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. सुमारे ७०० नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. येत्या शुक्रवारी निघणाºया पदयात्रेची तयारी सुरू असून, यात्रोत्सवात सहभागी होणारा रथ सजविण्यात आला आहे. पदयात्रेसाठी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. पापमोचनी एकादशी (दि. १३ ) ते फाल्गुन चतुदर्शी (दि. १६) पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन घेता येणार आहे.
सुमारे ४५ वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या रंगपंचमी सोहळ्याच्या पदयात्रेत गेल्या १५ वर्षांपासून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोणी, कोल्हार, सोनई, शनिशिंंगणापूर, टाकळीमियाँ, मिरी, तिसगाव मार्गे जाणाºया पदयात्रेत भक्त दररोज ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. पदयात्रेसोबत पिण्याच्या पाण्याचा टँकर, ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहने असतात.  गुरुवारी (दि. १) सकाळी ९ वाजता कोपरगाव आश्रमाचे प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते रथ, ध्वज व पालखीचे पूजन करण्यात येणार असून, सायंकाळी ६ वाजता कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. २) सकाळी रथाचे मढीच्या दिशेने प्रस्थान होईल.  रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी येथे भरणाºया यात्रेला महाराष्टÑातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात वावीच्या काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणूक काढून काठीला कळसाचे दर्शन घडवले जाते. वावी पदयात्रा समितीने मढी येथे मुक्कामासाठी जागा विकत घेतली असून, या ठिकाणी पायी जाणारे नाथभक्त विसावतात. पदयात्रा काळात तिसगाव, सोनई, टाकळीमिया आदी गावांसह गावोगावी रथाचे पूजन करण्यात येऊन गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येक गावातील गावकरी जल्लोषात स्वागत करतात. पदयात्रेनिमित्त वावी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक श्री कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
यावर्षी समाधीमंदिर चार दिवस खुले
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीक्षेत्र मढी येथील यात्रोत्सव होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस असतो. रंगपंचमी व गुढीपाडवा या दोन दिवशी मोठी यात्रा भरते. यापूर्वी केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी भाविकांना गाभाºयात जाऊन समाधीचे दर्शन घेता येत होते. त्यामुळे मोठी गर्दी होत असे. भाविकांना समाधीचे थेट दर्शन घेता यावे यासाठी समाधी मंदिर चार दिवस खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.

 

Web Title: Preparations for the journey from Vavi to Shrikhetra Madi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक