ओझरच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:56 PM2019-11-29T12:56:24+5:302019-11-29T12:56:58+5:30

ओझर : ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता भव्य ...

 Preparations for the Khanderao Maharaj Yatra of Ozar | ओझरच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी सज्जता

ओझरच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी सज्जता

Next
ठळक मुद्देविलोभनीय सोहळा : ग्रामपालिकेकडून तयारी, मंदीराला आकर्षक विद्युत रोषणाई

ओझर : ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता भव्य रूप धारण करत चार ते पाच दिवस भरते. यावर्षीही आजपासून सात डिसेंबरपर्यंत यात्रा भरणार आहे. त्यानिमित्ताने ओझर ग्रामपालिकेकडून संपूर्ण दुकानाची जागा वाटप जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतकडून करून देण्यात येणार असल्याचे ग्रामपालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. ओझर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिस स्टेशन कडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रौत्सवात पहिल्या दिवशी विश्वस्तांच्या घरातील कुटुंबप्रमुख घटस्थापना करतात. त्यानंतर षष्ठीपर्यंत श्री मल्हार माहात्म्य या ग्रंथाचे पारायण होते. प्रत्येक दिवशी चढत्या क्र माने मूर्तीवर पुष्पमाला चढविण्यात येणार आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी पारायणाच्या व्रताची सांगता होऊन पहाटे पुजारी व मान्यवरांकडून महापूजा करण्यात येणार आहे. महापूजेनंतर श्री खंडोबारायाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लावण्यात येणार आहे.तर पहिल्या दिवशी हवेत भंडारा उधळून आख्खं गाव पिवळं होतं. बाणगंगेच्या नदीचे दर्शन करून अश्व पुढे मंदिराकडे नेला जातो. खंडेराव महाराजांचा जयघोष करत कै. विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, वरचा माळीवाडा,मधला माळीवाडा, सिन्नरकर-निंबाळकर-चौधरी, पगार- गवळी, रास्कर, भडके, कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांचे बैलगाडी मल्हाररथ असे अश्वाच्या मदतीने बारा गाडयांना देवाचा हा वारू जोडुन गोरज मुहुर्तावर हे बारा गाडे ओढून यात्रेला सुरूवात होणार आहे. ही ईश्वरी अनुभुती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखों आबालवृध्द भाविक गर्दी करतात. भंडाऱ्याची उधळण व सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार अशा मल्हाराच्या जय घोषाने अवघा परिसर दुमदुमणार असून यात्रेच्या दुसºया दिवशी भाविक खंडेरावाच्या दर्शनाला गर्दी करतात.
-----------------------------
मंगळवारचा आठवडे बाजार राहणार बंद.
ओझर येथे दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार यात्रेमुळे बंद ठेवण्यात येणार आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणत उलाढाल होत असल्याने सर्वच गावातून नागरिक येथे येत असतात. त्यामुळे येणाºया मंगळवारी आठवडे बाजार भरणार नसल्याचे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे.
------------------------------
कलात्मक रथ अन् भाविकांचे आकर्षण
ओझरच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. सुबक कलाकृती, जुन्या पिढीतील सुतारकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हे रथ होय. या रथांची रचना बैलगाडीप्रमाणे असते. चाके, धुर्या, साटा, जू ही मूळ बनावट गृहीत धरतच त्याची घडण म्हणजे हा रथ असतो. मध्यभागी नक्षीदार स्तंभ त्याला चारही बाजूंनी पीळ देऊन दोऱ्यांनी ताण देतात. अलिकडे गजांचा वापरही मोठ्या प्रमाणात केलेला असतो. स्तंभावर बैलगाडीचे चाक चढवून ते आडवे फिरेल असे बसवतात. चाकावर चार चोपा काटकोनात लावतात व या चोपांना आठ सोटगे खालून जोडतात. तिच्या दोन बाजूंना वांगे व पपईत गज कलात्मकरितीने टोचतात. हे रथ जाताना प्रौढांकडे नियोजनाचे तर वयोवृद्धांकडे मार्गदर्शनाचे काम असते. सजवलेली बैलजोडी रथाला जोडण्यात येते. खंडेराव महाराजांचा जयघोष होतो व मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळविला जातो.

Web Title:  Preparations for the Khanderao Maharaj Yatra of Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक