एप्रिलअखेरपासूनच खरिपाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:37 PM2020-04-28T22:37:55+5:302020-04-28T22:59:48+5:30

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमधून शेती व शेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात शेत-शिवार गजबजलेले दिसत आहे.

 Preparations for kharif from the end of April | एप्रिलअखेरपासूनच खरिपाची तयारी

एप्रिलअखेरपासूनच खरिपाची तयारी

Next

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाउनमधून शेती व शेतीविषयक कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात शेत-शिवार गजबजलेले दिसत आहे. कोरोनामुळे भाजीपाला व फळभाज्यांच्या बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सध्याच्या पिकावर नांगर फिरवून खरिपाची तयारी सुरू केली आहे.
खरिपाच्या पिकासाठी अनेक कोरडवाहू शेतकरी मे महिन्याच्या मध्यापासूच मशागत सुरू करतात. यात प्रारंभी जमिनीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी परिसरात पालापाचोळा अथवा उरलेला पेंढा जाळून रोपवाटिकेसाठी जागा तयार केली जाते. प्रामुख्याने भात व नाचणी पिकांसाठी अशी प्रक्रिया अवलंबली जाते परंतु, यावर्षी काही बागायतदार शेतकरीही सोयाबीन पेरण्यापूर्वी जमिनीचे नैसर्गिक निर्जंतुकीकरण व मशागत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
--
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून अशाप्रकारे शेत रिकामे करून संपूर्ण मे महिन्यातील उन्हात वाळवून जमिनीचे नैसर्गिकरीत्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी अनेक शेतकरी विक्री व्यवस्था उपलब्ध नसलेली बागायती पिके काढून खरिपासाठी शेती तयार करण्यात व्यस्त झाले आहेत

Web Title:  Preparations for kharif from the end of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक