‘व्हॅलेंटाइन डे’ची तयारी वेगात

By admin | Published: February 10, 2017 12:23 AM2017-02-10T00:23:38+5:302017-02-10T00:23:50+5:30

बाजारपेठा सज्ज : निवडणुकांमुळे यंदा नसणार विरोध

Preparations for 'Valentine's Day' | ‘व्हॅलेंटाइन डे’ची तयारी वेगात

‘व्हॅलेंटाइन डे’ची तयारी वेगात

Next

 नाशिक : व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाच्या उत्सवासाठी गुलाबाची फुले, आकर्षक स्वादातले चॉकलेट, कॅडबरीसह गोड पदार्थ, ग्रिटिंग्ज, भेटवस्तू, हॉटेल्स, पर्यटनस्थळे आदि साऱ्यांची सज्जता झाली आहे. पारंपरिकतेने व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनला दरवर्षी होणारा विरोधाचा अडसर यंदा येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे दूर होणार असून प्रेमिजनांना मनसोक्तपणे हा दिवस साजरा करता येणार आहे.
प्रेमदिनासाठी शहरातील बाजारपेठा विविध भेटवस्तूंनी फुलल्या असून, गुलाब, गॅलिटर, टाटा गुलाब, फर्स्ट रेड, मिक्स गुलाब यांसह देशी-विदेशी गुलाबपुष्प आदि फुले बाजारात दाखल झाली आहेत. चॉकलेट्सचे नवीन प्रकार, टेडि बिअर, विविध आकर्षक भेटवस्तू दुकानांमध्ये सजल्या आहेत. अगदी दहा रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत मराठी व इंग्रजी शुभेच्छापत्रे, २० ते ५०० रुपयांपर्यंतची विविध प्रकारची चॉकलेट्स दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.
याशिवाय मिठाईच्या दुकानांमध्ये चॉकलेट केक, पेस्ट्री यांचेही असंख्य प्रकार तयार करण्यात येत आहेत. अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या आवडत्या प्रकारातल्या केक्सची आगाऊ आॅर्डर दिली आहे. लाल, गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जात असल्यामुळे भेटवस्तूंची दुकाने लाल-गुलाबी रंगात न्हाऊन निघाली आहेत. विविध वस्तूही लाल-गुलाबी रंगांच्या आकर्षक वेष्टनात मिळत आहेत. सध्या बाजारात चायना हार्टदेखील आले आहे. म्हणजे हार्ट शेपमध्ये किचेन, गॉग्लस, टोप्या, मग अशा विविध वस्तूंचा यात समावेश आहे. व्हॅलेंटाइनचा फिवर सध्या बाजारपेठेत सगळीकडेच पहायला मिळतो आहे. उशांचे कुशन्स, मग, लेटेस्ट फॅशनचे कपडे, मिठाया, खेळणी आदिंवर प्रेमप्रतीकांचा ठसा पहायला मिळत आहे. आपल्या प्रियजनांना प्रेमाची भेटवस्तू देण्यासाठी त्याची आगाऊ खरेदी करण्यावर बाजारपेठेत भर दिसून येत आहे.

Web Title: Preparations for 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.